Sunday 22 November 2015

शिवजयंतीचे संस्थापक राष्ट्रपिता जोतिराव फुले


शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला.  राष्ट्रपिता जोतिराव फुले र्फ तात्या यांना  

शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून फुले १८६९ साली रायगडावर गेले.  
शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास केला, पण त्यांना समाधी सापडेना. तीन  

दिवस जोतीराव फुले यांनी वेली तोडून घाणेरी काढली समाधीचा शोध घेतला.  तात्यारावांनी समाधी धुवून  
स्वच्छ केली. राजांच्या समाधीस तात्यारावांनी भक्तीभावाने अभिवादन केले  आणि समाधीवर फुले  

वाहिली.  तात्यारावांनी शिवरायांच्या समाधीची पुजा केल्याचे ग्रामजोशास समजले.. 


तेव्हा जोशाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला, समाधीवरील फुले लाथेने  

बाजूला सारली आणि तात्यांना म्हणाला अरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय  
राजा होता होय?' राष्ट्रपिता फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. तात्यांना खूप दु:  

झाले. त्यानंतर तात्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला. तात्यांनी शिवजयंतीला सुरुवात केली.   
१८७४ साली पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली. पेशव्यांच्या समर्थकांना  

याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते.  कारण रा.फुले यांनी २४ सप्टेंबर  

१८७३ रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात फार  मोठी जागृती केली होती.  

शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय   म्हणजे णेशोत्सव 


गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण  पेशवे कैवारी बाळ  

गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा  सार्वजनिक उत्सव केला.  

म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी १८९३ साली णेशोत्सव सुरु केला..!


PROOF :- (शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment