Friday 10 February 2017

"बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.

 "बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.    

भारताचा १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास.....

शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकवली जात नाही की,  ह्या भारतावर १२०० वर्षे पेक्षा जास्त वर्षे "बौद्ध" राजांचे राज्य होते........

प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य
यामुळे "पाली" भाषा ही भारताची "राजभाषा" होती, तर "बौद्ध" धम्म भारत देशाचा "राजधर्म" होता.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल 2००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या, अगदी अफगाणीस्थानातील कंदाहारपर्यत ह्या लेण्या व बुद्ध मुर्त्या पाहावयास मिळतात.
म्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास प्राचीन भारत हे "बौद्धराष्ट्र" होते ह्याची ग्वाही देतात.

भारतात २००१ च्या जनगणनेनूसार १०० कोटीपैकी १ कोटीच लोक बौद्ध होते.
परंतु जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १५० कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही.
ही लोकसंख्या तलवारीच्या किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता, तत्वज्ञान व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली आहे.
याला कारण बौध्द धम्मतील तत्वज्ञान आणि  भारतातील बौद्धराजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसार जगभर केला.......
बौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क,मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे पाल असे छोटे मोठे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला.
त्यापैकी सम्राट अशोक या महान सम्राटाने भारतजंबुद्वीपात एकुण 84000 स्तुप, विहार व लेण्या बांधल्या याचा पुरावा अशोकस्तंभात लिखीतस्वरूपात मिळतो.

म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला,विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी "बौद्ध" तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची १९ विद्यापीठे निर्माण झाली, व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद् विद्यापीठांनी केले.....

भारत जेव्हा "बौद्धमय" होता, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता. महिलांना मान-सन्मान होता, सर्वांना न्याय मिळत होता. जागतिक व्यापारात भारताचा वाटा सुमारे ३०% हून अधिक होता. सोन्याचा धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशयोक्तीने म्हटले जाते. भारत सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता. आजही भारताला संपूर्ण जगात "बुद्धाचे राष्ट्र" किंवा "बुद्धभूमी" म्हणूनच ओळखतात. भारतात कुठेही उत्खनन केले तर तथागत बुद्धांच्या मूर्त्याच सापडतात.

 एका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की,
 ज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय.
"बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.