Sunday 17 January 2016

🍀*बुद्धांची शिकवण*🍀

🍀*बुद्धांची शिकवण*🍀
 
🌀१) मूर्खांची संगती करु नका.
🌀२) विद्वानांची संगती करा.
🌀३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
🌀४) अनुकूल देशात निवास करा.
🌀५) चांगली कामे करा.
🌀६) चित्तास स्थिर ठेवा.
🌀७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
🌀८) विद्वान व्हा.
🌀९) संयमी राहा.
🌀१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
🌀११) मातापित्याची सेवा करा.
🌀१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
🌀१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
🌀१४) दानधर्म करा.
🌀१५) धम्माचरण करा.
🌀१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
🌀१७) निर्दोष कर्मे करा.
🌀१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
🌀१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
🌀२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
🌀२१) गौरवाची भावना जोपासा.
🌀२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
🌀२३) क्षमाशील असा.
🌀२४) संतुष्ट असा.
🌀२५) कृतज्ञ असा. लीन असा.
🌀२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
🌀२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
🌀२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
🌀२९) ब्रम्हचारी राहा.
🌀३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
🌀३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
🌀३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
🌀३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
🌀३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ
ठेवा.
🌷-नमो बुद्धाय🌷


।।पंचशील।।
🌹मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹मी चोरी करण्यातासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹मी मद्य,मादक तसेच इतर सर्वमोहांत पाडणार्या मादक वस्तुंच्या सेवनातासुन अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.

 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔵चार आर्य सत्य🔵
🍀दुःख :
:- मानवी जीवनात विविध स्वरुपात दुःख अस्तित्वात असते.
🍀दुःख समुदाय :
:- दुःख तीव्र इच्छा व तृष्णेपासून निर्माण होते.
🍀दुःख निरोध :
:- तीव्र इच्छा व तृष्णेला समूळ नष्ट करुन दुःखापासून मुक्तता होवू शकते.
🍀दुःख निरोगामिनी प्रतिपदा :
🌷:- दुःख मुक्तिचा मार्ग आहे. तो मार्ग आहे बुद्धांनी मार्गदर्शीत केलेला आर्य अष्टांगिक मार्ग.

🔶आर्य अष्टांगिक मार्ग🌷  (सदाचाराचा मार्ग)
🍃सम्यक दृष्टि :- निसर्ग नियमा विरुद्ध कोनतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
🌱सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
🌿सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.
🌾सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
🌸सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
🌺सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
🌴सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास ( मनाला) जागृत ठेवणे.
🌲सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन् अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे।

🔴दहा पारमिता🔴 (शिल मार्ग)

🍁1) शिल :- शील म्हणजे नितिमत्ता,वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
🍁2) दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त,देह अर्पण करणे.
🍁3)उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत रहाणे.
🍁4) नैष्क्रिम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
🍁5)वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
🍁6) शांति :- शांति म्हणजे क्षमाशीलता,द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
🍁7) सत्य :- सत्य म्हणजे खरे,मानसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
🍁8) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
🍁9) करुणा :- सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
🍁10) मैञी :- मैञी म्हणजे सर्व प्राणी,मित्र,शञूविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमाञाविषयी बंधुभाव बाळगणे.


जर आपण या बौद्ध् तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो व जीवंतपणीच
मुक्ति प्राप्त करु शकतो.
🍀 सबका मंगल हो .🍀
🌺🍀🌷🍂🌿

Wednesday 6 January 2016

देव व आत्मा विषयी भगवान गौतम बुद्धांचे एका पंडीतासोबतचे संभाषण..

तथागत भगवान बुध्दांना एका पंडित विद्वानान विचारल की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.
तथागत भगवान बुध्द म्हणाले, तुम्हाला असे कुणी सांगितले की मी असे बोललो?
तर पंडित म्हणाला नाही असे कुणी सांगितले नाही.
मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का तर पंडीत म्हणाला नाही.
मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ? पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चेतून तसेच ऐकले आहे. तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?
तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो. पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा. मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत. ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो.
१)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा.
माणूस डोळ्याने बघतो.
कानाने आवाज ऐकतो.
नाकाने वास घेतो.
जीभेने चव घेतो.
आणि त्वचेने स्पर्श जाणतो.
या पंच ज्ञानेंद्रीयां पैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.
पंडित विचारतो कसे ?
पाणी डोळ्याने दिसते पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते.
गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते.
पंडित म्हणाला बरोबर पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?
तथागत म्हणाले तुम्ही हवा पाहू शकता ?
पंडित म्हणाला नाही.
याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?
पंडित म्हणाला नाही.
हवा दिसत नसली तरी ती आहे. कारण तिच् आस्तीत्व नाकारता येत नाही, आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते, झाड, पान हवेने हलतात ते दिसत,
तथागत म्हणाले आता मला सांगा, देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?पंडित म्हणाले नाही.
तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?
पंडित-नाही.
तुमच्या आईवडीलांनी पाहिल्याच सांगितलंय ?
पंडित-नाही.
मग पूर्वजां पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?
पंडित-नाही .
मग तथागत म्हणाले, आमचं इतकच म्हणण आहे की जे आजवर कुणीच पाहिलं नाही. आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही, त्याला गृहीत धरायचं नाही. त्याचा उपयोग नाही.
ज्ञानी पंडिताला बऱ्यापैकी पटायला लागल होतं तरी त्यानं प्रश्न विचारला.
तथागत ठिक आहे पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही.
तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही.
पंडित म्हणाला हो. बरोबर आहे.
मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?
पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो.
मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर.
पंडित-आत्मा
तथागत- का सोडतो आत्मा शरीर ? कंटाळा आला म्हणून ?
पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर.
तथागत म्हणाले तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे.
अपघात, आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे,
पंडितजी-तथागत बरोबर आहे तुमच. पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?
तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता, त्यात एक भांडं, भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता. बरोबर ?
पंडित-बरोबर.
मग मला सांगा वात कधी विझते ?
पंडित-तेल संपत तेंव्हा.
तथागत-आणखी ?
पंडित-तेल आहे पण वात संपते तेंव्हा.
तथागत-आणखी ?
पंडितजी काहीच बोलले नाहीत, तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले, वारा आला, पणतीच फुटली तर पणती विझु शकते,
मानव देह ही एक पणती समजा. आणि जीव म्हणजे आग (उर्जा) सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे.
१) पृथ्वी - घनरुप पदार्थ (माती)
२) आप - द्रवरुप पदार्थ (पाणी, स्नीग्ध तेल)
३) वायु - वारा
४) तेज - उर्जा, उष्णता
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो. उर्जा बनने थांबते.
यालाच म्हणतात माणूस मरणे. आणि सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे असे तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे.
तथागत ज्ञानी पंडिताला म्हणाले, देव आहे की नाही. आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही. धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसाने कसं जगावं याचं मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो. आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळे नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो.
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.
कोंबडी आधी की अंडे हे शोधण्यापेक्षा शाश्वत जीवन जगण्यासाठी धम्म अत्यंत गरजेचा आहे. जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे .
धम्म एक प्रकाशित मार्ग आहे. तो आचरणात आणला की नक्कीच मोक्ष आहे.