Sunday 27 December 2015

१ जानेवारी १८१८, भीमा कोरेगावचा शौर्यशाली इतिहास


भीमा कोरेगावचा शौर्यशाली इतिहास

१ जानेवारी १८१८ चा दिवस. जगाच्या इतिहासातील एका अतुल्य पराक्रम आणि शौर्याचा दिवस. याच दिवशी जुलमी व अन्यायी पेशवाईचा अंत झाला होता. हि लढाई पुण्याजवळील भिमाकोरेगांव येथे ब्रिटीश आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात झाली होती. या लढाईत ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रटीच्या सेकंड महार बटालियनच्या केवळ ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८००० सैन्याचा पराभव केला आणि देशातील जुलमी मनुवादी व्यवस्थेचा अंत केला.
महार सैनिक पेशव्यांच्या विरुद्ध लढण्याची काही कारणे होती. मनुस्मृतीनुसार महार व इतर अस्पृश्य समाजाला गुलाम बनवले गेले होते. त्यांच्यावर अन्यान्वित अत्याचार केले गेले. त्यांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्यांना कठोर व अमानवीय शिक्षा दिल्या जात होत्या. लहान मुले, स्त्रिया यांचेदेखील शोषण केले जात होते. हा अत्याचार हजारो वर्षांपासून अस्पृश्य समाज भोगत आला होता. छत्रपती शिवरायांच्या काळात मात्र अस्पृश्यांना या अत्याचारातून मुक्ती मिळाली होती. शिवाजी महाराजांमुळे अस्पृश्यांचे गुलामीचे जीवन नष्ट होऊन त्यांना मानाचे स्थान मिळाले होते. स्वराज्य स्थापनेत अस्पृश्य समाजाने खूप मोलाची कामगिरी बजावली. संभाजी राजेच्या मृत्युनंतर झालेल्या संग्रामात नागेवाडीच्या महारांनी व मौजे वेलंग येथील सिदनाक महाराने मोगलांना जेरीस आणले होते. 
भीमा कोरेगावच्या लढाईपूर्वी महार सैनिक हे पेशव्यांचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी मुघल व ब्रिटीश सैन्याविरुध्द इमानदारीने व प्राणपणाने लढले होते. त्यांनी पेशव्यांना अनेक विजय मिळवून दिले. परंतु या महार सैनिकांना सत्ताधिका-यांच्या (ब्राम्हण सैनिक) अवहेलना व अपमानाशिवाय काही मिळत नव्हते. खर्ड्याच्या लढाईत शिदनाक महाराने पराक्रम करून माधवराव पेशव्यास विजय मिळवून दिला होता. परंतु लढाईच्या मैदानातच शिदनाकसह महार सैनिकांचा ब्राम्हणाकडून अपमान करण्यात आला होता.
पेशव्यांनी अस्पृश्य जातीतील मांग व चांभार यांना आपले लक्ष केले नव्हते. केवळ महाराना ते पाण्यात पहात असत. एकंदरीत महारांची पेशव्यांना भीती वाटत होती. रणांगनावर महार लोक करीत असलेले पराक्रम व त्यांना मिळत असलेले नेत्रदीपक यश बघून पेशवे राज्यकर्त्यांच्या मनात धडकी व दशहत बसली होती. महारांच्या या वाढत्या पराक्रमाला योग्यवेळी पायबंद घातला नाही तर महार हे शत्रूस मिळून पेशवेशाही बुडवतील किंवा स्वत:च राज्यकर्ते बनतील अशी शंका व धास्ती नेहमी पेशव्यांच्या मनात असे. महार लोक हे जरब महात्वाकांक्षी दिसतात हे पेशव्यांना कळून चुकले होते. त्यामुळेच सत्ता व धर्माच्या माध्यमातून महारांना बंधनात अडकविण्याचे षडयंत्र रचण्यात आले.
अस्पृश्य समाजातील विशेषत: महारांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेण्यासाठी मांग, चांभार व महार यांची अतीशुद्र व अस्पृश्य म्हणून गणना करण्यात आली व त्यांना गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहण्यास बाध्य करण्यात आले. या अतिशुद्रांनी आचरण कशा पध्दतीने करावेत व त्यांची कर्तव्ये काय असावीत याची संहिता तयार करण्यात आली. मनुस्मृतीमध्ये या संहितेला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. मनुस्मृतीच्या कायद्याचे पालन न करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. पेशवे स्वत:च कोकणस्थ ब्राम्हण असल्यामुळे मनुस्मृती तंतोतंत लागू करण्याचा आपला जन्मसिध्द हक्कच आहे या अविर्भावात वागत असत. 
अस्पृश्यांना बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती. अस्पृश्यांना ठरवून दिलेल्या वेळेशिवाय सार्वजनिक रस्ते सुध्दा वापरता येत नव्हते. अस्पृश्य वर्गाला स्पर्श करणे हे पाप असून त्यांची सावलीसुद्धा अंगावर पडू दिली जात नसे. त्याकरिता अस्पृश्यांना गावात सकाळी नऊ वाजन्याच्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे कारण त्या कालावधीत सूर्यप्रकाशामुळे माणसांची सावली लांब पडत असते व अस्पृश्य माणसाची सावली इतर स्पृश्य लोकांवर पडू नये म्हणून हा नियम बनवण्यात आला होता. अस्पृश्यांना देवळात, पाणवठे व शिक्षणास मज्जाव करण्यात आला. पेशवाईच्या काळात अस्पृश्य समाजाच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडके व पायाखालील रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू लावण्याची सक्ती करण्यात आली होती. कारण त्यांच्या थुंकीवर पाय पडला तर विटाळ मानला जाई. तसेच पायाचे ठसे जमिनीवर उमटल्यानंतर त्या ठश्यांवर कोणत्याही स्पृश्य माणसाचा पाय पडू नये म्हणून ते ठशे झाडून जाण्यासाठी कंबरेला झाडू बांधला जाई. 
अस्पृश्यांनी तीर्थास जाऊन मंदिर प्रवेश केल्यास त्याचे परिपत्य करावे असे पेशवा सरकारचे सक्त आदेश होते. ब्राम्हण रस्त्यात भेटला तर अस्पृश्यांनी लगलेच खाली बसावे व पालथे पडावे असा दंडक होता. दुस-या बाजीरावाच्या काळात एखादा महार वा मांग तालीमाखान्यापुढून गेल्यास गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे असा महाभयानक अत्याचार अस्पृशावर होत असे. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. अस्पृश्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच्छ व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. खेड्यातील विहिरीजवळून महार जात असताना त्याला गुडघ्यावर रांगत जावे लागत असे, कारण त्याची सावली पाण्यावर पडली म्हणजे विटाळ मानला जात असे.
ब्राम्हणाने अस्पृश्य स्त्रिशी व्यभिचार केला तर तो त्यांना चालत असे. तेव्हा विटाळ बिटाळ याची ते परवा करीत नसत. ब्राम्हणांची अशी प्रकरणे बाहेर आल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नसे तर केवळ प्रायश्चित घेत असत. त्यामुळे गुन्हे करणे व प्रायश्चित घेऊन परत गुन्हा करणे हा ब्राम्हणांचा धंदाच झाला होता. दुसरा बाजीराव पेशवाने कित्येक स्त्रियांवर बलात्कार केले. तो कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने उचलून आणून शनिवारवाड्यात अत्याचार करत असे. पेशव्यांच्या या अत्याचारवरूनच तर समाजात ‘पाशवी अत्याचार, पाशवी बलात्कार' हे शब्द रूढ झाले आहेत. दुसरा बाजीरावची स्त्रियांमध्ये इतकी दहशत पसरली होती कि कित्येक स्त्रियांनी विष पिऊन आत्महत्या केल्या.
महार-मांगावर कोणीही अत्याचार करावा व त्यांनी तो निपुटपणे सहन करावा अशी प्रथाच रूढ झाली होती. त्यामुळे महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुरु झाली. इमारतीच्या पायात, किल्ला, किल्ल्याचा बुरुज, पूल, तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. अशा अस्पृश्यतेच्या नावाखाली पेशव्यांनी अस्पृश्यांना दिलेली वागणूक अन्यायकारक व क्लेशदायक होती. हा अन्याय व अपमान सहन करण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 
या अस्पृश्य समाजाने ब्रिटीशांच्या सैन्यात भरती होण्यास सुरुवात केली कारण ब्रिटीश अधिकारी अस्पृश्य म्हणून कधीच कोणाचा भेदभाव करत नव्हते. उलट ते इथल्या जातीवादी व मनुवादी व्यवस्थेचा तिरस्कार करत होते आणि म्हणूनच अस्पृश्य समाजातील लोक ब्रिटीश सैन्यात भरती झाले. ब्रिटीश अधिकारी पेशव्यांविरुद्ध लढाई करण्यास योजना तयार करू लागले तेंव्हा ब्रिटीशांच्या महार बटालियनचा सेनापती 'शिदनाक महार' हा दुसरा बाजीराव पेशव्यास भेटण्यास गेला आणि त्याने बाजीरावास सांगितले कि, "ब्रिटीश हे परके आहेत, आम्ही त्यांच्या बाजूने न लढता आपल्या बाजूने लढू. आम्ही मायभूमीसाठी प्राणदेखील अर्पण करू, फक्त आम्हाला आपल्या राज्यात सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार द्या." परंतु पेशव्यांनी त्याची हि मागणी अमान्य केली आणि सांगितले कि, "तुम्हा अस्पृश्यांना आमच्या राज्यात सुईच्या टोकाएवढादेखील सन्मान भेटणार नाही." अशाप्रकारे खूप अपमानजनक शब्द वापरून पेशव्यांनी शिदनाक महारास हाकलून दिले. त्यामुळे शिदनाक महार याने ठरवले कि, या देशातून जुलमी पेशवाई राजवट कायमची नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्य समाजाला न्याय भेटणार नाही. आणि अखेर १ जानेवारी १८१८ रोजी तो दिवस आला आणि पेशवाईने केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची संधी महार बटालियनला मिळाली.
शिरूर छावणीपासून ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रट्रिच्या महार बटालियनचे ५०० सैनिक पुण्याच्या दिशेने पुणे काबीज करण्यासाठी निघाले. ब्रिटीशांकडून कॅप्टन Fransis Stauntons हा बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रट्रिच्या महार बटालियनचे नेतृत्व करत होता आणि शिदनाक महार हा या बटालियनचा सेनापती होता. ब्रिटीश पुण्याकडे निघाले आहेत हि बातमी दुसरा बाजीराव पेशवाला समजताच त्याने बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली २८००० सैन्याचा फौजफाटा शिरूरच्या दिशेने पाठवला. महार बटालियनचे सैन्य अन्नपाण्याविना, कडाक्याची थंडीत २७ मैलांच्या अथक पायी प्रवासानंतर कोरेगाव भीमा येथे पोहचले. 
दोन्ही सैन्याची सकाळी १० वाजता भीमा कोरेगाव येथे आमनेसामने गाठ पडली. पेशव्यांच्या २८००० सैन्यापुढे ब्रिटीश महार बटालियनचे ५०० सैनिक तुटपुंजे होते. युद्धाला तोंड फुटले आणि पेशव्यांच्या सैन्याने ब्रिटीश सैन्याला घेराव घातला. ब्रिटीशांचा एक सैनिक पेशव्यांच्या ५०-५५ सैनिकांसोबत लढत होता. आपली तहान भूक विसरून हे महार बटालियनचे सैन्य शत्रूला तोंड देऊ लागले. महार बटालियनचा प्रत्येक सैनिक हा सुडाच्या भावनेने पेटून उठला होता. त्यांना समोर फक्त आपल्यावर अत्याचार करत आलेला मनुवादी शत्रू दिसत होता, आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अत्याचाराचा बदला घेण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला होता. त्यांचे रक्त सळसळू लागले, त्यांनी त्वेषाने तलवारीच्या मुठी आवळल्या आणि शत्रूच्या देहाचे तुकडे पडायला सुरुवात झाली. रक्ताचे पाट वाहू लागले. त्यांचे शस्त्र जातीयवादी सैतानावर तुटून पडत होते. चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीच्या विषमतावादी शत्रूचा खात्मा चालू होता. पेशव्यांच्या अफाट सैनिकांची संख्या क्षणाक्षणाला कमी होऊ लागली. पेशव्यांचे सैन्य खचू लागले. यातच बापू गोखले यांचा मुलगा देखील मारला गेला. बापू गोखले आपल्या मुलाचे शीर मांडीवर घेऊन ढसाढसा रडू लागला. हे पाहून पेशव्यांच्या सैनिकांची दाणादाण उडाली. पेशव्याचे सैन्य मागे हटू लागले व वाट मिळेल तिकडे पळू लागले. १ जानेवारी १८१८ रोजी रात्री ९ वाजता हे युद्ध संपले आणि महार बटालियनने ब्रिटीशांना अविश्वसनीय असा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पेशव्यांची जुलमी व अत्याचारी राजवट या देशातून कायमची नष्ट झाली. मनुस्मृतीच्या विषमतावादी व्यवस्थेचा अंत झाला आणि अस्पृश्य समाजाची हजारो वर्षापासुनच्या गुलामीतून मुक्तता झाली.
या लढाईत २२ शूर महार सैनिक शहीद झाले. ब्रिटीशांनी या शूर वीरांना अभिवादन करण्यासाठी आणि नव्या पिढीला या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा मिळावी म्हणून २६ मार्च १८२१ साली भीमा कोरेगाव येथे भीमा नदीकिनारी विजयस्तंभ उभारला. या विजयस्तंभावर शहीद झालेल्या २२ सैनिकांची नावे कोरलेली आहेत. अशाप्रकारे जुलमी पेशवाईचा अंत करणाऱ्या या शूरवीरांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीस नेहमी या विजयस्तंभास भेट देऊन अभिवादन करत असत. आणि तेंव्हापासून दरवर्षी देशातून लाखो अनुयायी या शूरवीरांना वंदन करण्यासाठी येत असतात.
पेशवाईचा अंत करणाऱ्या शूरवीरांना विनम्र अभिवादन..!

"We proud of the Soldiers of Mahar Battalion..! We salute you..!"

Wednesday 2 December 2015

भारतीचे संविधान आणि मनुस्मृती यामधील फरक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून पुस्तकांवर खूप प्रेम करत होते. नंतर त्यांनी आपल्या पुस्तकांवरील प्रेमाखातर पुस्तकांसाठी राजगृह हे घर बांधले. परंतु याच पुस्तकप्रेमी विद्वानाने २५  डिसेंबर १९२७  रोजी महाड येथे कोट्यावधी पददलित जनतेला हीन समजणारया विषमतावादी मनुस्मृती या पुस्तकाचे दहन करून क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली होती.

काय होते या मनुस्मृती मध्ये जाणून घेऊन या भारतीचे संविधान आणि मनुस्मृती यामधील फरकातून:-

१) मनुस्मृती:- [1.31, 429, 499] निच ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,
 
ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥
अर्थ - ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.
 
संविधान:- [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.
२) मनुस्मृती:-[99, 98, 1.91] कपटी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्ष­कीपेशा कोणीही करु शकत नाही.
संविधान:- [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते 
३) मनुस्मृती:- .[1.88, 98, 90, 130] लबाड ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.
संविधान:-[कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.
४) मनुस्मृती:- [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.
संविधान:- [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.
५) मनुस्मृती:- [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. 
संविधान:- [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.
६) मनुस्मृती:- [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.
संविधान:- [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
७) मनुस्मृती:- [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.
संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.
८) मनुस्मृती:- [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.
 
संविधान:- मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात. 
९) मनुस्मृती:- [11.127, 129.30, 10.381] भट ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.
 
संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे. आपल्या राज्यघटनेमुळे राजेशाही, सरंजामशाही नेस्तनाबूत झाली. राज्यघटनेमुळे सर्व समाज व बहुजनांमध्ये आमूलाग्र बदल झाला. एकेकाळी मनुस्मृतिनुसार सती जाणारी स्त्री आज देशाची पंतप्रधान अथवा राष्ट्रपती बनू शकते. ही व्यवस्था बदलण्याचे काम राज्यघटनेमुळे झाले आहे. सामाजिक सुधारणा व सामाजिक परिवर्तन ही राज्यघटनेची देणगी आहे. संविधानामुळे राणीच्या पोटी जन्माला येणारा राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला.परंतु स्वातंत्र्याचे सुराज्य झाले नाही. कारण त्यांच्या पोटात मनुस्मृती व ओठात संविधान या बाजिंदेपणामुळे राष्ट्रीय विकास झालाच नाही. राजकीय व प्रशासनव्यवस्थेमुळे सामान्यांच्या विकासात अडथळे येत आहेत. त्यामुळे राजकारण व प्रशासन व्यवस्थेतही त्या दृष्टिकोनातून बदल घडायला पाहिजेत.
मनुस्मृतीचे समर्थक असणार्‍यांच्या मनातून मनुस्मृती अजूनही जात नाही. त्यामुळे देशात रोज अनेक अविपरीत घटना घडत असतात. त्यासाठी भारतीय संविधानाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे . तरच या देशात स्वांतत्र्य, समता, बंधुता, न्याय व विज्ञान या पंचसूत्री वर आधारित भारत निर्माण होईल.
मनुस्मृतीने स्त्रिया आणि शुद्र ह्या दोघांना जनावरापेक्षा खालची वागणूक द्यावी हे लिहिले आहे, आजही शिकल्यासवरलेल्या स्त्रिया मुली मासीक पाळीत स्वयंपाक घरात जात नाहीत, देवळात जात नाहीत, आजही वयाच्या तिशीत विधवा झालेल्या मुलीना अगदी घाणेरडी स्थळे येतात, मात्र घटस्फोटीत मुलाला जॉब चांगला असला तर प्रथम वधु मिळते, पण मुलीना घटस्फोटीत किंवा विधुर हेच पर्याय असतात. कौमार्याचा इतका बावू करून ठेवलाय कि बास. मुलगी झाली तरी स्त्रीला दोष, वाईट घडलं तरी तीच पांढर्‍या पायाची असं सांगते मनुस्मृती. बहुजनांना न्याय द्यायचा असेल तर भारतीय संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी गरजेची आहे. वरिष्ठ नोकरशहा हा कनिष्ठांना व सामान्यांना हीनतेची वागणूक देत आहे. सोशल वर्णाश्रमाची मनुवादी व्यवस्था पद्धती प्रशासनामध्ये आहे. पोटात मनुस्मृती व ओठात संविधान या वृत्तीमुळे राष्ट्रीय विकास झालाच नाही. शासन व्यवस्थेत वरिष्ठ नोकरशहा हे नियंत्रित कार्यसंस्कृतीचाअवलंब­ करतात. त्यामुळे प्रशासनात व या कार्यसंस्कृतीत बदल घडवला पाहिजे. राजकीय नेतृत्वाने हे ध्यानात घेऊन बदल घडवले पाहिजेत. ‘भारतीय संविधान आणि शासनव्यवस्था किती जवळ, किती दूर?’ हे बहुजनांनी समजून घेतले पाहिजे. 
मनुस्मृतीने स्त्रीदास्याचा सातत्यानेच पुरस्कार केलेला आहे आणि त्याचा प्रभाव जनमानसावर टिकून आहे. मनुस्मृतीच्या प्रभावामुळे आजच्या विज्ञान युगामध्येदेखील स्त्रियांवर पाशवी अन्याय अत्याचार होताना दिसून येतात. मनुस्मृतीचा अभ्यास करून, तिची निरर्थकता पटल्यानंतर भारतातील ज्या विद्वानांनी मनुस्मृतीला कचराकुंडीचा रस्ता दाखविला त्या विद्वानांपैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, '' मनुस्मृती हा ब्राह्मण्याचा एक दैवत ग्रंथ होऊन बसला आहे. कोणत्याही आत्मविश्वासू , स्वावलंबी आणि अतुल पराक्रमी राष्ट्राला गुपचूप हतबल करून त्याच्या पायांत गुलामगिरीच्या अभेद्य श्रृंखला ठोकायच्या असतील तर त्याला नित्य मनुस्मृतीचे डोस ढोसण्यास द्यावे. हटकून ते राष्ट्र नामर्द, परावलंबी आणि पतीत झाल्याशिवाय राहणार नाही.'' प्रबोधनकारांच्या वरील उद्गारावरून देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्तीचा डांगोरा पिटणार्‍यांच्याडोळया­त अंजन घातले जाईल काय ! खर्‍या अर्थाने आपल्या राष्ट्राला नामर्द, पतीत आणि परावलंबी बनवायचे नसेल तर देशातील स्वाभिमानी वीरांनी प्रथमत: मनुस्मृतीला गाडून टाकणेच आवश्यक आहे. प्रबोधनकारांचे हे विचार आजही प्रेरणादायी आहेत. निधर्मी समाज आणि निधर्मी राज्य ह्या तत्त्वाला प्रबोधनकारांनी मान्यता दिलेली आहे.थोडक्यात प्रबोधनकारांच्या सामाजिक विचारांमध्ये वर्तमान काळाच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता आहे.
मनुस्मृतीने ज्या वर्गाच्या आणि जातीच्या हितसबंधाचे रक्षण केले, त्या वर्गाचा जळफळाट होत आहे. मनुस्मृती आणि भारताची राज्यघटना ही दोन ध्रुवाची दोन टोके आहेत. मनुस्मृती विषमतेचा पुरस्कार करते तर भारताची राज्यघटना समतेचा पुरस्कार करते त्यामुळे मनुस्मृतीच्या समर्थकांना भारताची राज्यघटना सोसवत नाही. ती त्यांच्या डोळयात कुसळाप्रमाणे एकसारखी सलत आहे. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. भारतीय संविधान आणि मनुस्मृती यातील फरक लक्षात घेवून बहुजन समाजाने आपला शत्रु कोण व मित्र कोण आहे हे ओळखावे. आता मनुस्मृतीप्रमाणे नव्हे, तर भारतीय संविधान याप्रमाणे आपली वाटचाल सुरू ठेवावी. मनुस्मृती दहनाचा इतिहास आठवावा. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.
 
स्त्री मुक्ती दिनाला ... मनूस्मृती दहन दिनानिमित्त क्रांतिकारी सलाम...  विषवल्ली रोवणाऱ्या मनूस्मृतीची विषारी रोपटे मुळासकट उपटून काढत संवैधानिक प्रशासनाचा पाया रचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन !!

Tuesday 1 December 2015

बाबासाहेब आणि शिवाजी महाराज यांच्यातील साम्य


१) शिवाजी महाराजाच्या अजोबाचे नाव- मालोजी भोसले.आणि डॉ.बाबासाहेबाच्या आजोबाचे नाव-मालोजी सकपाल. 

२) शिवाजी महाराजाचे वडील सेनापती होते.आणि बाबासाहेबाचे वडील सुभेदार होते. 

३) शिवाजीचा जन्म १९फेब्रुवारी १६३०रोजी शिवनेरी किल्यावर झाला.त्याकाळीन शिवनेरी हे राजधानीचे ठिकाण होते. चारी बाजूने सैन्याचा पारा चारीबाजूने दारू गोळा.आणि डॉ.बाबासाहेबाचा जन्म १४एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशच्या महु ह्या मिलेट्री कँम्प मध्ये झाला.त्याही ठिकाणी चारीबाजुने दारु गोळा व सैन्य.

४) लहान पनी शिवाजींना लोक शिवा म्हनत व बाबासाहेबाना भिवा म्हनत.

५) पाचव साम्य हे आपल्याना मानलच पाहीजे ते सत्य आहे.ज्यावेळी शिवाजी महाराजाचा राजेभिषेक होता त्यावेळी काही सनातनी ब्राम्हणानी मनुस्मृती च्या आधारावर शिवाजी महाराजाना शुद्र ठरविले आणि महाराजाच्या राजेभिषेकाला विरोध केला. त्या अपमानाचा बद्दला डॉ.बाबासाहेबानी घेण्याचे ठरविले.आणि बाबासाहेबानी २५डिसेबंर १९२७रोजी रायगडाच्या बरोबर पायत्याशी महाड ह्या ठीकानी मनुस्मृती दहन केली.तीही एका ब्राम्हनाच्या हातुन.

६) शिवाजी महाराजाच्या मंञीमडंळात सर्व जाती पंताचे लोक होते.सर्वाना समान अधिकार होते.समान न्याय व्यवस्था होती.डॉ.बाबसाहेबानी आपल्याला राज्यघटनेत तिच शासन व्यवस्था तिच लोकशाही आणली... .

मानवानेच देवाची निर्मिती केली त्याचे पुरावे.

मानवानेच देवाची निर्मिती केली त्याचे पुरावे.

१) माणुस सोडुन जगातील एकही प्राणी देव मानत नाही.
२) जिथ माणुस नाही पोहचला तेथे मंदिर मस्जिद किंवा चर्च नाही सापडले.
३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच अर्थ मानवाला जसी कल्पना सुचली तसा देव तयार झाला.
४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानीक देवता आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही.
५) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत
६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत.
७) मानला तर देव नाही तर दगड ही म्हण उगीचच नाही तयार झाली.
८)तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे संत वचन
९)जगातील देवतांचे वेग वेगळे आकार व त्यांना प्रसन्न करण्याच्या वेगवेगळ्या पुजा
१०) आता पर्यंत ठाम पणे मला देव भेटला असे कुणी सांगु शकला नाही
११) देव माननारा व न माननारा ही सारखेच आयुष्य जगतो
१२) देव कुणाचेच काहीही भले वा वाकडे करू शकत नाही
१३) देव कोणताही भ्रष्टाचार अन्याय चोरी बलात्कार आतंकवाद अराजकता रोखू शकत नाही.
१४) लहान निष्पाप बालकावर गोळ्या घालनाराचेही हात धरू शकत नाही.
१५) मंदिर मठ आश्रम प्रार्थना स्थळे व देवांचे वास्तव्य ज्या ठिकाणी मानले जाते 

      त्या ठिकाणी सुद्धा बालके स्त्री सुरक्षीत नाही.
१६)मंदीर मस्जिद व चर्च पाडताना देव एकदाही आडवा आला नाही की बांधताना 

     नगर पालीकेची परवानगी घेतली नाही
१७) अभ्यास नकरता एकाही देवाने विद्यार्थ्याला पास केल्याचे आठवत नाही.
१८) केदारनाथ मध्ये एकाच वेळी १०००० लोक मेली एकालाही त्याने वाचवले नाही
१८) ब-याच देवांचा २५ वर्षापुर्वी मागमुसही नव्हता ते प्रख्यात देव झाले आहेत
१९) स्वतःस भगवान म्हणून घेणारे सध्या जे़लची हवा घेत आहेत
      का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत
२०) जगात २५० कोटी लोक देवच मानत नाहीत तरी ते समाधानाने व आनंदाने रहात आहेत.
२१) हिंदु अल्लाला मानत नाही मुस्लीम देवाला मानत नाही ईसाई देव व अल्लाला मानत नाही

     हिंदू मुस्लिम गॉड मानत नाही तरीही कोणत्याही देवाने एकमेकांला विचारले नाही की असं का?
२२) एक धर्म म्हणतो त्याला आकार नाही दुसरा देवाला आकारदेवुन फॅन्सी कपडे घालतो,
      तिसरा वेगळच सांगतो म्हणजे नेमके काय
२३) देव आहे तर लोक धाक का पाळत नाहीत
२४) समाजाला घातक गोष्टी का करतात.
२५) जो मांसाहार करतो तोही जगतो नाही करत तोही जगतो दोन्ही खातो तोही जगतो
२६) अमेरिका देव मानत नाही तरिही महासत्ता आहे.
२७) आपल्या कडे ३३कोटी देव आधिक महाराज आधिक अल्लाहआधिक गॉड अाधीक संत महंत ऊत आला     आहे तरी पाऊस नाही. गरीबी पासुन मुक्ती नाही शेतक-यांच्या आत्महत्या कमी नाहीत

 बलात्कार कमी नाही रोगराई कमी नाही भ्रष्टाचार कमी नाही.
 

या सर्व बाबी वरून लक्षात येते की मानसाला देवाचा धाक नाही कारण देवाचा निर्माता मानवच.

Monday 30 November 2015

वन मॅन आर्मी - डॉ . बाबासाहेब आंबेडकर

वन मॅन आर्मी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असा एकही योद्धा या पृथ्वीतलावर 
जन्माला आला नव्हता ...
पुढे बाबासाहेब जन्माला आले 
आणि सर्व जग बदलवून टाकले 
तेदेखील एक थेंब देखील रक्ताचा न सांडविता ! 
म्हणून वन मॅन आर्मी फक्त बाबासाहेबच !
 
घाबरणे आमच्या रक्तात नाही.. 
कारण आमचा बाप बापांचा बाप होता..
कितीही मनुवादी शक्तिशाली असले तरी 
त्यांला एकटाच बास होता
 
अग विझवणारे जरी पाणी असले तरी 
पाण्याला आग लावणारा माझा भीम होता
काळ्या रामाला एवढ्या बंदोबस्तातही 
घाम फोडणारा माझा भीम होता
 
अरे उपाशी मेला असता गांधी,  
त्याला जीवदान देणारा माझा भीम होता
झाले असते ३६ तुकडे देशाचे 
त्यांना एकत्र बांधणारा माझा भीम होता
 
रक्ताचे पाणी करून लिहिलेले संविधान
देशाला बहाल करणारा माझा भीम होता
भारत कधीच जाती-धर्मात वाटला गेला असता
सर्वांना एकत्र बांधणारा माझा भीम होता
 
शिवरायाचा अपमान करणाऱ्या मनुला(मनुस्मृती)
मातीत गाढणारा माझा भीम होता
काय सांगू महती या युगंधराची...
अशोकानंतर धम्मचक्र प्रवर्तक माझा भीम होता.. 
अजून भरपूर लिहायचे आहे पण 
लिहिताना शब्द अपुरे पाडणारा माझा भीम होता...