Sunday 22 November 2015

बाबासाहेबांची घटना स्त्रीयांवर अनंत उपकार करणारी



बाबासाहेबांची घटना कशी समतावादी स्त्रीयांवर अनंत उपकार करणारी आहे हे खालील माहीतीवरून सिद्ध होत आहे.
1) मनुस्मृतील श्लोक क्रमांक -१४८ नुसार पूर्वी स्त्रीला नव-यापासून घटस्फोट घेण्यास मनाई होती. नवरा कसाही असला तरी तिने नव-यासोबतच राहावे असे तिच्यावर बंधन टाकले होते. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.
घटनेच्या कलम अनुसूची () नुसार नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार स्त्रीला दिला आहे.
) मनुस्मृतील श्लोक क्रमांक -४१६ नुसार पूर्वी त्नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नव्हता. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली तरीही त्यात तिचा हक्क नव्हता.
घटनेच्या कलम ३०० () नुसार स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही. तसेच डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार स्त्रिला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्यात आला आहे.
) मनुस्मृतील श्लोक क्रमांक -२९९ नुसार पूर्वी स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला होता. तसेच स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला होता.
घटनेच्या अनुसुची क्रमांक ()() नुसार स्त्रिला मारहान करणे स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय स्त्रिला त्रास होवू नये म्हणून इंडियन माईन्स ऎक्ट १९४६ ची निर्मिती करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंत काम करण्यास रात्रपाळीस बंदी घातली. तसेच माईन्स मॅटर्निटी बेनेफिट ऎक्ट तयार करुन स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस केली. पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला. त्याच प्रमाणे घटनेच्या कलम ४२ नुसार गर्भवती बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.
) मनुस्मृतील श्लोक क्रमांक -१४७ नुसार पूर्वी कुटुंबातील कोणत्याही स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता.
घटनेच्या कलम १४ नुसार स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३९ () नुसार उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार दिला. तसेच घटनेच्या कलम ३२५ नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून त्यांना सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर करुन बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.
) मनुस्मृतील श्लोक क्रमांक .१६ नुसार पूर्वी स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक .३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.
घटनेच्या अनुसुची क्रमांक ()() नुसार स्त्रियांची मानहानी करणे कलम १४ नुसार लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या कलम ३९ () नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही असे सांगितले आहे
) पूर्वी विधवा स्त्रिचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्त्रिला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणार्या कुप्रथा स्त्रियांवर लादल्या होत्या.
घटनेच्या कलम ५१ () नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणार्या सर्व सामाजिक धार्मिक कुप्रथा अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.
हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना बहुजन समाजाला गुलाम केले. म्हणूनच महात्मा फुल्यांनी, ‘मनुस्मृती जाळली पाहिजेअसे जळजळीत उद्गार काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला. ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी समता, स्वातंत्र, बंधुत्व न्यायावर आधारित भारतीय घटना 6 नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पन करुन तिची अंमलबजावनी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.
आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत. तेव्हा भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणार्या या महामानवा समोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायला पाहिजे.

1 comment: