Tuesday 15 May 2018

☸ *बुद्ध धम्म अनुसरण संघाची गरज का ?*

*बुद्ध धम्म अनुसरण संघाची गरज का ?*
*BDAS सम्यक संकल्प*
*( सम्मा संड़कप्प - Right thoughts )*
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
"भारतात बौद्धधम्माच्या वृक्षाची पाने वाळली असली तरी त्याची मुळे मात्र हिरवीगार आहेत. त्यांना जर थोडे पाणी मिळाले तर बौद्ध धम्माचा वृक्ष पुन्हा फोफावुन आल्याशिवाय राहणार नाही" अशी खात्री बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होती. त्या वृक्षाला बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर, १९५६ ला पाच लाख अनुयायांच्या हातांनी जलसींचन केले आणि आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली की आता भारतात आलेली बौद्धधम्माची लाट कदापीही परत जाणार नाही. त्याच आत्मविश्वासाच्या बळावर पुन्हा एक भीमप्रतीज्ञा उच्चारली, *"जर मी काही काळ अधिक जगलो तर संपूर्ण भारत बौद्धमय करुन दाखवीन"* त्यासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई, मद्राससारख्या महानगरात मोठमोठे बुद्धविहार उभारण्याची योजना बोलून दाखवली आणि श्रीलंकेतील पाली भाषेच्या जाणकारांकडून पालीतील त्रिरत्नवंदना, जयमंगल अष्टगाथा आणि त्रिशरण पंचशिलाच्या रेकॉर्ड्स तयार करवुन घेतल्या. स्वत: बौद्धपूजापाठ नावाची छोटीशी पुस्तिका प्रकाशित केली. सामान्य जनतेला बौद्धधम्माचे आचार-विचार आणि तत्वज्ञानाबरोबरच तथागत बुद्धांचे चरीत्र समजून घेता यावे म्हणून *'दी बुद्धा अँड हिज धम्मा'* नावाचा आधुनिक बौद्धांचा एक आदर्श, मुख्य मार्गदर्शक आणि दर्जेदार धम्मग्रंथही लिहून ठेवला.
*त्याबरहुकुम आचरण करण्याचा उपदेश करताना महारामांगांचा धम्म म्हणतील असे वर्तन घडु देऊ नका असा धोक्याचा व सावधगिरीचा ईशाराही द्यायला ते विसरले नाहीत.* मोझेसने आपल्या ज्यु लोकांना जशा टेन कमांडमेंट्स दिल्या तश्याच बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बावीस प्रतीज्ञा दिल्या. स्वाभाविकपणे त्यांचा आनंद गगनात मावेना झाला होता आणि त्या आनंदाच्या भरात बाबासाहेब म्हणाले, "आज माझा पुनर्जन्म झाला, माझी नरकातुन मुक्ती झाली."
परंतु आपल्या अनुयायांना बोट धरून चालायला शिकवायच्या आधीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि नवदीक्षित बौद्ध जनतेवर आकाशच कोसळले. आता त्यांना "दी बुद्धा अँड हिज धम्मा" शिवाय दूसरा गुरुच उरला नाही. तथागत बुद्ध अंतीमसमयी आनंदाला म्हणाले, आनंदा ! माझ्या निर्वाणानंतर मी तुम्हाला उपदेशीलेला धम्मच तुमचा गुरुशास्ता समजून अनुसरण करावे. बाबासाहेबांना अंतिम समयी असा संदेश देऊन जाण्याचीही संधी मिळाली नाही.
अश्या परिस्थितीत बौद्ध जनतेने सापडेल त्या माध्यमातून धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष अनुसरणालाही सुरवात केली. परंतु बौद्धधम्मात पूजाअर्चा, प्राथना, नवसायास, बळी आदींना वाव नसल्यामुळे बुद्धीवादाच्या आधारावरच धम्माच्या शंकाकुशंकाचे निरसन करणे भाग पडले आणि ते खऱ्या अर्थाने योग्यच होते. बाबांसाहेबांच्या *"दी बुद्ध अँड हिज धम्म"* ग्रंथाने योग्य मार्ग दाखवले आणि त्या दिशेने आपण मिळेल ते योग्य ज्ञान घेऊन धम्माचे अनुसरण करत आहोत.
अश्यातच बाबासाहेबांची ही चळवळ पुढे कश्या प्रकारे न्यावी ? ही नक्की कुठल्या दिशेने जाणारी चळवळ होती ? - राजकीय, सामाजीक की धम्म चळवळ ? हा गंभीर प्रश्न सर्वांना पडतो. सखोल अभ्यासाअंती ह्याचे उत्तर बाबासाहेबांची चळवळ ही धम्म चळवळ होती हेच लक्षात येते. ते कसे तर, सुरवातीला ही चळवळ माणसाला माणुस म्हणून ओळख देण्याकरताची होती आणि पुढील टप्प्यात ती बुद्ध धम्मावर आधारीत संविधानाद्वारे माणसाला माणुस म्हणुन ओळख दिल्यानंतर, माणसाला माणुस म्हणून जगता यावे यासाठीची चळवळ होती. हे काम फक्त बुद्ध धम्म ह्या धाग्यामुळेच होऊ शकते असा त्यांचा विश्वास होता. कारण धम्म हा एकमेव धागा आहे ज्यात सर्व मनुष्य प्राण्याला एकत्रित गुंफु शकतो. धम्म ही माणसाला माणसापासुन वेगळे करणाऱ्या धर्म कींवा जात नावाच्या संकल्पनेच्या विरोधातील अशी नीतिपर शिकवण आहे जी माणसाला माणुस म्हणुन जगायला शिकवते, दुःख मुक्तीचा मार्ग दाखऊन वैयक्तिक प्रगतीतुन सामाजीक प्रगती करायला शिकवते.
भगवान बुद्ध हे बुद्ध धर्माचे संस्थापक होते असा खोडसाळ प्रचार केला जातो. खरे तर ते जगातील पाहिले तत्ववेत्ते (Philosopher) होते. धम्म म्हणजे कुठला धर्म नसुन मनुष्य जीवनाला सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी भगवंतांनी दिलेली अतिशय व्यवहारीक आणि वैज्ञानीक तत्वे आहेत. जी अनुसरली तर मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. धम्म चळवळीच्या बाबतीत बाबासाहेब बोलतात -
🎙 _"I have been struggling throughout my life to abolish this evil practice of division based on caste and mutual hatred. In reality, I feel Guilty of starting late the work of revival of Buddhism in India. But even then I hope and believe that my people who, sacrificing their own comforts, have been faithfully following me. I hope and I trust they will continue to struggle sincerely to propagate the Buddha Dhamma in India.”_
*Dr. B. R. Ambedkar*
*Wrtings & speeches*
*Vol 17, part 1, 59, page 449*
वरील बाबासाहेबांच्या १३, नोव्हेंबर, १९५६ च्या म्हणजे धम्म दीक्षा सोहळ्या नंतरच्या विधानावरुन स्पष्ट कळते की त्यांना काय अपेक्षित होते. भारतात बुध्द धम्म पुनर्जीवीत करण्याचे काम उशीरा चालु केले म्हणून त्यांना अपराधी (Guilty) असल्या सारखे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या *महापरीनिर्वाणापूर्वीच्या काही काळ आधीच्या* सर्व विधानांचा आपण सर्वांनी खोलवर विचार करणे गरजेचे आहे.
🎙 _"बुद्धाचा मार्ग वेगळा होता. त्याचा मार्ग माणसाचे मन बदलण्याचा, माणसाचा स्वभाव बदलण्याचा होता. जेणेकरुन माणुस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा अगर जबरदस्तीचा वापर न करता करील. माणसाचा स्वभाव बदलण्याची त्याची मुख्य साधने त्याचा धम्म व धम्माची अखंड शिकवण ही होती."_
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*बुद्ध आणि कार्ल मार्क्स*
*काठमांडू (नेपाळ)*
*१७/ नोव्हेंबर /१९५६*
वरील त्यांच्या भाषणात तर त्यांनी त्यांचा धम्म देण्यामागील मुळ उद्देशच सांगीतलेला आहे. त्यांना बुद्धांच्या *धम्म आणि त्याच्या अखंड शिकवणींनी* समाजाचे मन परीवर्तन करायचे होते. कारण धम्माचे खरे प्राथमिक उद्दिष्ट मनुष्याची कायिक, वाचीक आणि मानसीक शुद्धता करुन कुशल कर्मे करण्यासाठी मनाला वळण (संस्कार) लावणे आहे.
भगवान बुद्धांची शिकवण प्रामुख्याने पंचशील, अष्टशील, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रज्ञायुक्त दहा पारमितांचा मार्ग, प्रतीत्यसमुत्पादाचा सिद्धांत, अनित्य बोधाचा सिद्धांत, अनात्मवादाचा सिद्धांत आणि संपूर्ण नीरश्चरवाद अश्या काया, वाचा आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धता करणारी सर्व धम्मजीवनमूल्ये यावर प्रामुख्याने आधारीत आहे. या सर्वांना मिळून 'धम्म' म्हणतात. ह्या सर्व धम्म मूल्यांच्या संगमाशिवाय दुःख मुक्ती नाही. बुद्ध धम्म फक्त बोलण्यापुरता, वाचण्यापुरता कींवा फक्त उपदेश नाही तर तो परीयत्ती ( Theory) आणि पटिपत्ती ( Practicle) दोन्ही आहे. भगवान बुद्धांचा धम्म *यही पस्सिको* आहे म्हणजे या आणि पहा म्हणजे स्वअनुभव करा आणि त्यानंतरच स्वीकारा असा उपदेश करण्याचे धाडस करतो. धम्मामुळेच समाजाचे मनपरीवर्तन होऊ शकते असा बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता.
🔸 _श्रावस्तीच्या जेतवनाराम मधे स्थविर चक्खुपालला उपदेश देताना तथागतांनी पुढील गाथा म्हणाली होती._
*मनो पुब्बङ्गमा धम्मा, मनो सेट्ठा मनोमया।*
*मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोति वा।*
*ततो नं दुक्खमन्वेती, चक्क व वहतो पदं।।*
--🔸 धम्मपद-१
🔹 *अर्थ -*
सर्व धर्म ( चेतना ) पहिल्या मनात उत्पन्न होतात, मनच मुख्य आहे, सर्व मनोमय आहे. जेव्हा मनुष्य मलीन मनाने बोलतो किंवा कार्य करतो, त्यावेळी दुःख त्याच्या मागे मागे तसच जात जस बैलगाड़ीची चाके बैलाच्या पायाच्या मागे मागे.
_तथागत पुढे असे म्हणाले :-_
*मनो पुब्बङ्गमा धम्मा, मनो सेट्ठा मनोमया।*
*मनसा चे पसन्नेन, भासति वा करोति वा।*
*ततो नं सुखमन्वेति, छाया व अनपायिनी।।*
--🔸 धम्मपद-२
🔹 *अर्थ -*
जेंव्हा मनुष्य स्वछ मनाने बोलतो किंवा कार्य करतो तेव्हा, सुख त्याच्या मागे मागे तसच येत जस आपली स्वत:ची सावली. मन स्वच्छ असेल तर शांतीच भेटणार, मन प्रदुषित असेल तर शांती कुठे ? दुःखच भेटणार. मैत्री प्राप्तिसाठी मन स्वच्छ असण गरजेच आहे. मैत्री कुणाला नको आहे ? सर्व प्राण्यांना मैत्री पाहीजे असते.
मनुष्य मात्राच्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजीक, सांस्कृतीक, आर्थिक, राजकीय ई. क्षेत्रातील कलहाचे, दुःख व दारिद्रयाचे मुलभुत कारण मनातील विकार कींवा दुष्ट प्रवृत्ती हेच आहे. वरील धम्मपदाच्या गाथांच्या अध्ययनातून हेच सिद्ध होते की, जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधीत आहे कींवा जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधीत आहे, ते सर्व मनातुन उत्पन्न होते. सध्या कार्यरत असलेल्या बऱ्याचश्या शिक्षण संस्था कींवा ईतर सामाजीक संस्था यांचे कार्य भौतिक जगाच्या परीवर्तनाचे कार्य आहे. मनाच्या विधायक परीवर्तनाचे कार्य नाही. मन हेच प्रधान असल्याने मनाचा अभ्यास, त्यावरील अकुशल संस्काराचे निदान आणि त्यावर ठोस उपाय हीच भगवान बुद्धांची शिकवण आहे. *बुद्ध धम्म अनुसरण संघ* माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला विधायक वळण देऊन मानवी जीवन सुखी करण्याचे कार्य करत आहे. सर्व दुःखापासुन मुक्तीचा *धम्माचे अनुसरण करणे* हा एकमेव ऊपाय आहे.
*धम्मंच दुविधं वरं*
धम्म व्यवहारीक, अध्यात्मिक आणि वैज्ञानीक असा तीनही प्रकारांनी युक्त आहे.
📍 - _व्यवहारिक पक्ष_ :
माणुस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते, हे भगवान बुद्धांच्या धम्माचे पहीले अधिष्ठान/उद्दिष्टआहे.
📍 - _आध्यात्मिक पक्ष_ :
मनुष्य दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे जग दुःखात भरलेले आहे. म्हणुन दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया होय.
मानवी जीवनातील माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते मंगलमय, कल्याणकारी बनविणे आणि मानवी मनातील लोभ, द्वेष, अविद्या नष्ट करुन त्याचे व्यक्तिगत जीवन सुखी, निरोगी आणि दुःखमुक्त बनविणे, हाच *बुद्ध धम्म अनुसरण संघाचा* हेतु आणि उद्देश आहे. या उद्देशपूर्तीसाठी, मानवी मनाला सत्यानुरूप प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी लागणारी भौतिक साधनसामुग्रीही निर्माण होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने *बुद्ध धम्म अनुसरण संघ* मार्गदर्शन आणि बोध कींवा सत्याचा साक्षात्कार अशा दुहेरी पद्धतीने प्रयत्नशील आहे. कारण भौतिक आणि अभिभौतिक जगाचे नेतृत्व आणि व्यवस्थापन मानवी मनाद्वारेच केले जाते म्हणुन मानवी मनाचे प्रशिक्षण हेच व्यक्तीच्या सर्वांगिण कल्याणाचे साधन होय अशी *बुद्ध धम्म अनुसरण संघाची* मान्यता आहे.
📍 _मानवी मनाच्या प्रशिक्षणाचा व्यावहारिक - सैद्धांतिक पक्ष_ :
खाली नमुद करत असलेला सैद्धांतिक पक्ष हा, व्यवहारिक आणि माणसांच्या दैनंदीन जगण्यातील नातेसंबंध प्रस्थापित व्हावा, इतकेच नाही तर हा आदर्श रोजच्या व्यवहारिक, बोलण्या- वागण्यातील संबंधात म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिगत, सामाजीक, कौटुंबिक, सांस्कृतीक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक ई. क्षेत्रातील नातेसंबंधात प्रस्थापित व्हावा ही अपेक्षा हा संघ करतो.
*मानवी संबंध सुधारण्यासाठी व जीवनातील दुःखांचा नाश होण्यासाठी संघाचे उद्दिष्ट*
_१. पावित्र्याचा मार्ग_
_२. सदाचारणाचा मार्ग_
_३. शील मार्ग_
या तत्वांचा अवलंब करण्याबाबत सातत्याने कार्यक्रमांच्या माध्यमाने मार्गदर्शन करणे आणि सदर तत्वांच्या प्रचार- प्रसाराचे पवित्र कार्य करणे.
🔸 *१. पावित्र्याचा मार्ग (विशुद्धी मार्ग)*
ज्याच्या समोर कोणताच आदर्श नाही, अशा पतिताला आपण पतीत आहोत हेच कळले नाही, त्यामुळे तो नेहमीच पतीत राहतो. या उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतीत आपल्या पतितावस्थेतुन वर येण्याचा प्रयत्न करीत असतो का ? याचे उत्तर असे की, आपण पतीत आहोत हे त्याला माहीती असते.
*पंचशील* हे आदर्श जीवनमुल्य का स्विकारावे ? ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या व इतरांच्या हिता- सुखासाठी उपयोगी आहे की नाही ? या प्रश्नाच्या उत्तरात आहे. प्रज्ञावंत हे ओळखतो.
*विशुद्धीच्या मार्गातील चांगल्या जीवनाची पाच तत्वे :-*
* कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला ईजा न करणे.
* चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तु न बळकावणे.
* व्याभिचार न करणे.
* असत्य न बोलणे.
* मादक पदार्थ कींवा पेय ग्रहण न करणे.
ह्या तत्वांचा संघ प्रचार प्रसार करत आहे.
🔸 *२. सदाचारणाचा मार्ग ( आर्य अष्टांगीक मार्ग )*
*_सम्यक दृष्टी :-_*
मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधनमुक्तही करू शकते. सदाचारणाच्या मार्गातील पहीले अंग *सम्यक दृष्टी* जे करू शकते हेच होय. सम्यक दृष्टी अविद्येचा नाश करते. दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग आर्य अष्टांगीक मार्ग ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय.
*_सम्यक संकल्प :-_*
माणसाचे धेय्य, आकांशा महत्वाकांशा व इच्छा या निष्काम भाव कींवा त्याग, मैत्रीपुर्ण व करुणापुर्ण असाव्यात, आपल्या इच्छा दुसऱ्यांना नुकसान होईल अशा नासाव्यात.
*_सम्यक वाचा :-_*
बोलण्यात चुगली चहाडी नसावी, कठोर वचन कींवा शिविगाळ नसावी. असत्य बोलु नये आणि वाचाळ बडबड नसावी, तर सत्य, प्रेमळ आणि मीतभाषी असावे.
*_सम्यक कर्मांत :-_*
प्राणि हिंसेपासुन विरत राहणे, चोरी पासुन विरत राहणे आणि व्याभिचारापासुन विरत राहणे म्हणजेच अस्तित्वाच्या नियमांनुसार जीवन सुसंगत जगणे होय.
*_सम्यक आजीविका :-_*
दुसऱ्यांची हानी कींवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग आहेत, ते चांगले होत याला सम्यक आजीवीका म्हणतात.
*_सम्यक व्यायाम :-_*
अष्टांग मार्गाच्या विरोधी मनोवृत्ती उत्पन्न होऊ न देणे, उत्पन्न झाल्यास त्यांना नष्ट करणे. अष्टांग मार्गाला आवश्यक चित्तवृत्ती उत्पन्न करणे, उत्पन्न चित्तवृत्तीची वाढ करणे, विकास करणे हा व्यायाम मनाचा व्यायाम आहे.
*_सम्यक स्मृती :-_*
जागरूकपणा व विचारीपणा याची यात आवश्यकता आहे. कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना व धम्मानुपश्यना या स्मृतीप्रस्थानाचा यात अभ्यास असतो.
*_सम्यक समाधी :-_*
चार ध्यानांचा साक्षात्कार करणे आणि मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते, सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.
हा आर्य अष्टांगीक मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग होय, ह्या मार्गाचे पालन करणे व या तत्वाचा प्रचार- प्रसार करणे *बुद्ध धम्म अनुसरण संघाचे* कार्य आहे.
🔸 *३. शील मार्ग - ( दहा पारमिता )*
१. *दान*
स्वार्थाची कींवा परतफेडेची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी मालमत्ता, रक्त, देह आणि प्राण त्याग करणे म्हणजेच दान होय.
२. *शील*
शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेल्या मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभिरुता.
३. *नैष्क्रम्य*
म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग
४. *शांती (क्षांति)*
म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे हे याचे सार होय कारण द्वेषाने द्वेष कींवा वैराने वैर शमत नाही तर तो क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.
५. *वीर्य*
म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न. हाथी घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे म्हणजे वीर्य
६. *सत्य*
म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहीजे ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.
७. *अधिष्ठान*
म्हणजे धेय्य गाठण्याचा दृढ़ निश्चय
८. *मैत्री*
म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्रांविषयीच नव्हे तर शत्रुविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जिवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.
९. *करुणा*
म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपुर्ण दयाशीलता.
१०. *उपेक्षा*
म्हणजे औदासिन्याहुन निराळी अशी अलिप्तता, अनासक्ति, आवड कींवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलीत न होणे परंतु नीरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय.
आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे अनुसरण केले पाहीजे म्हणुनच त्यांना पारमिता (पूर्णत्वाच्या अवस्था) असे म्हणतात.
*विशुद्धीमार्ग ( पंचशील), सदाचारणाचा मार्ग ( आर्य अष्टांगीक मार्ग ) आणि शील मार्ग ( दहा पारमिता ) या तत्वज्ञानाचा मनुष्याच्या सामाजीक तसेच व्यक्तिगत जीवनातील महत्व आणि उपयोगीता समजुन घेऊ :-*
लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्याभिचार, खोटे बोलणे, व्यसन यामुळे व्यक्तिगत शुद्धिचा पाया ढासळतो. यामुळे व्यक्ती चांगल्या गोष्टी करण्यास साधनभुत होऊ शकत नाही. दुसऱ्यांना गुलाम करण्यात, त्यांच्यावर सत्ता गाजवण्यास, दुसऱ्यांचे जीवन दुःखी करण्यास, दुसऱ्यांना हिन समजुन त्यांचा द्वेष करण्यात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात लोकांना काहीच कसे वाटत नाही ? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत हेच त्याचे कारण नव्हे काय ? मनुष्याने सदाचार मार्गाचा अवलंब केल्यास एक माणुस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दुर होणार नाही काय ? गरजु आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी व लोककल्याणासाठी दान आवश्यक नाही काय ? जेथे दारिद्रय आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरऊन ते नष्ट करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय ? निस्वार्थपणे कार्य करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय ? मानवी कल्याणाचा विचार करणारा बुद्धिमान मनुष्य या सर्व प्रश्नांचे होकारार्थी उत्तर देईल कारण या तत्वांची उपयोगिता व्यक्तिगत जीवन सुखी करण्या करीता जितकी आहे, तितकीच सामाजीक न्यायाचे म्हणजेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व न्यायाचे जीवन जगण्यासाठीही आहे.
म्हणुनच मानवी मनाच्या प्रशिक्षणाचा म्हणजेच व्यावहारिक वागणुकीचा सैद्धांतीक पक्ष मानवी कल्याणाच्या हेतुपूर्तीसाठी आवश्यक आहे. या तत्वाचे मार्गदर्शन व प्रचार - प्रसार *बुद्ध धम्म अनुसरण संघ* करत आहे.
*🔸 मनाच्या प्रशिक्षणाची अध्यात्मिक बाजु*
मानवी मनाचे अन्वेषण करुन सत्याचा साक्षात्कार करणे कींवा प्राकृतिक नियमांचा मनाद्वारे बोध घेऊन दुःख मुक्तिची व्यक्तिगत जीवनात अनुभूती घेणे ही अध्यात्मिक बाजु ही *बुद्ध धम्म अनुसरण संघ* विशेष पद्धतीद्वारे कींवा ध्यानाद्वारे शिकवीत आहे व या पद्धतीचा प्रचार - प्रसार करत आहे. याला ध्यान कींवा समाधी कींवा भावना म्हणतात. अध्यात्मिक पक्ष हा अनुभुतीजन्य असल्याने त्याचे विश्लेषण देण्याची आवश्यकता वाटत नाही.
अश्या प्रकारे मानवी जीवन कल्याणमय सुखी बनविण्यासाठी मार्गदर्शन आणि ध्यान आणि बोध या पद्धतीचा अवलंब करुन मानवी जीवनाचा बाह्य वर्तनीय व्यवहार आणि अंतर्मन बदलुन माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तिंना योग्य वळण देऊन अखिल मानवी जीवन सुखी करण्याचा उद्देश आणि कर्तव्य समोर ठेऊन *बुद्ध धम्म अनुसरण संघ* कार्य करीत आहे. संघाच्या या हेतुपुर्तीसाठी लागणारी भौतिक साधने कींवा बहुजन हिताय - बहुजन सुखाय असे काही संकल्प जे ह्या पिढी सोबतच येणाऱ्या पिढींनाही उपयोगी व कल्याणकारी ठरणार आहेत, ते संकल्प पुर्ण करण्यासाठी *बुद्ध धम्म अनुसरण संघ* एका विशिष्ठ पद्धतीने कार्यरत राहील.
*BDAS (बुद्ध धम्म अनुसरण संघ) संकल्पना*
भगवान बुद्धांचा भिक्खु संघ निर्माण करण्याचा असा उद्देश होता की, जर एकट्यानेच सत्याचे अवलंबन करण्याचा निर्णय घेतला तर पुढेमागे तो निर्बल होऊन आपल्या जुन्याच मार्गावर जाऊ शकतो, म्हणून भिक्खूंनी संघटित व्हावे. सामाजीक वातावरणात वास करीत असतांना गुणसंपन्न, निस्वार्थी आणि विद्वान व्यक्तींच्या मनात देखील स्वाभाविक पणेच कामवासना व ईतर स्वार्थी इच्छा उद्भवतात, यास्तव अश्या सामाजिक वातावरणापासून त्यांचे अंग काढून घ्यावे आणि त्या व्यक्तींनी आपले आयुष्य परमज्ञानाच्या लाभाकरता अर्पण करावे, दुसऱ्यांना शिकवण्यास व मार्गदर्शन करण्यास त्यांचा उपयोग व्हावा या उद्देशाने भिक्खु संघ स्थापन करण्यात आला होता.
पुष्कळशे लोक गृहस्थजीवनाचा त्याग करुन परिव्राजक होऊन इतरत्र फिरत असत. सत्याच्या शोधात आणि प्रवचने देत देत हे हिंडत असत. काही जण गुरुच्या अधीन राहत असत तर ईतर एकटेच फिरत असत. त्यांचा संघ नव्हता कींवा निश्चित नियम कींवा उपनियमही नव्हते. इतिहासात प्रथमत: च भगवंतांनी संघाचे आयोजन केले त्यासाठी नियम बनवले आणि संघाच्या सदस्यांकरीता एक निश्चित आदर्श उपस्थित केला.
संघाची स्थापना करताना पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश दिला ; संघटित व्हा, एकमेकांना मदत करा व एकमेकांच्या प्रयत्नांना बळकट करा. बंधुभावाने, प्रेमाने व पावित्र्याच्या कळकळीने एकत्र रहा. जगाच्या कानाकोपऱ्यात धम्माचा प्रसार करा, हाच तो पवित्र बंधुसमाज हीच ती धम्मसंघटना.
त्याकाळी संघाच्या सदस्यांपैकी काही जण बौद्धिक दृष्टया आणि नैतिक दृष्टया कमी दर्जाचे असू शकतात कारण भगवान बुद्धांनी शिकवले आहे की, केवळ जे नितिपर उपदेशाकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देतात, आपल्या मनाला शिस्त लावतात, आणि पावित्र्याच्या व पूर्णावस्थेच्या आठ अवस्थांपैकी निदान एकिला सिद्धिस नेण्याचा प्रयत्न करतात, त्यांचाच भगवंतांच्या संघात समावेश होत असे. त्यांनी स्पष्ठपने सांगितलेले होते की, 'त्रिसरणा' मध्ये ज्या संघाचे वर्णन आलेले आहे , त्याचा अर्थ केवळ अठ्ठ आर्य पुग्गली असाच आहे. म्हणजे ज्यांनी पूर्णावस्थेच्या आठ अवस्थांपैकी निदान एकिला सिद्धिस नेले आहे, अशा महामना कींवा थोर मनांच्या व्यक्ती होत. केवळ पित वस्त्र कींवा काषाय वस्त्र धारण केल्याने कींवा केवळ धम्म दीक्षेने एखादा मनुष्य शुद्ध कींवा सुज्ञ कींवा आदरणीय होत नाही. आणि अयोग्य भिक्खूंना खरा बौद्ध आपला मार्गदर्शक म्हणून स्विकारणार नाही. स्त्रोतापन्न , सकृदागामी, अनागामी आणि अहर्त अश्या चार पुरुष जोड्या आणि त्या प्रत्येकाचे मार्ग व फळ मिळून आठ पुग्गल ( व्यक्ति ) असतात.
आपल्याला नवीन तत्वज्ञानाची कींवा नविन काहीतरी शोधण्याची गरज नाही, कारण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला " बुद्ध धम्म " या अश्या मार्गावर आणून सोडले आहे की ज्या मार्गावर चालले कींवा ते तत्वज्ञान राबवले, म्हणजेच धम्म अनुसरला तर तो आपले, तसेच आपल्या आजुबाजूच्या मानवाचे कल्याण करणारच करणार. हजारो वर्षापूर्वीपासून हे सिद्ध होत आले आहे. बौद्धमय भारताच्या ईतीहासाची पाने चाळली तर असे लक्षात येते की त्या काळीच भारत प्रदेश हा ज्ञानी, समतेचा, समृद्ध व सुखी-समाधानी प्रदेश होता. त्याच काळात भारत सोने की चिडीया होता..
_संघ म्हणजे मनात कुठलेही कपट न ठेवता इमानदारीने एखाद्या उद्दीष्ठांसाठी शिस्तीने आणि समर्पित भावाने काम करणाऱ्या शील व सदाचारीत लोकांचा समुदाय. सध्याचा *बुद्ध धम्म अनुसरण संघ (रजि )*हा एक आदर्श उपासक आणि उपासिकांचा संघ आहे. संघ एक दुरदृष्टीने आखलेल्या योजने नुसार (Blue print ) भारताच्या बऱ्याच राज्यात सक्रीय आहे. संघाकडे इथून पुढे २ पिढ्याच्या कामाची योजना आहे. त्या क्रांतिकारी कार्याला योग्य न्याय देणारे समर्पित भीमसैनिक सेनापतीच्या शोधात बुद्ध धम्म अनुसरण संघ आहे. भविष्यात संघाचा भिक्खूंचा संघही असणार आहे. बुद्ध धम्म अनुसरण संघ हा निश्चित नियम तसेच शिस्तीवर उभा राहत आहे व राहील. संघाच्या प्रत्येक ५ दिवसीय कार्यशाळा शिबिरामधे १-१ सेनापती तापुन सुलाखून बघीतला जाणार आहे. संघाच्या उद्दीष्ठांना पूर्ण करण्यासाठी ज्या Mind-set ची आवश्यकता आहे, तो Develope होण्यासाठी ह्या कार्यशाळा घेतल्या जातात. यशस्वी होण्यासाठी संघाच्या सर्व सेनापतींच्या मनाला वळण लागणे अतिशय आवश्यक आहे._
संघाचे सर्व नियम व शिस्त सर्व संयोजक, सेनापती तसेच सदस्यांसाठी बंधन कारक असणार आहे.
माणसाच्या हातून जे चांगले अथवा वाईट कर्म घडत असते, त्याचे मुळ मनाच्या चेतनेमध्ये असते. म्हणजेच त्याचे चित्त अथवा मन हे केंद्रवर्ती असते आणि म्हणून कुशल कर्मांताकरिता मनाला संयमित करणे महत्वाचे आहे. मानवी मन चंचल, चपळ, अनियंत्रित असते. ज्याप्रमाणे बाणाला सरळ करतो त्याप्रमाणे मेघावी (बुध्दीमान) पुरुष आपल्या चित्ताला सरळ करतो. एक शत्रू आपल्या शत्रूचे आणि एक वैरी आपल्या वैर्‍याचे जितके नुकसान करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान वाईट मार्गावर लागलेले चित्त करीत असते. आई-वडील, नातेवाईक जेवढे चांगले करु शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदा चांगल्या मार्गावर लागलेले चित्त करीत असते. म्हणुन कुशल कर्म करण्यासाठी चित्त सुध्दा स्थिर असायला पाहिजे. म्हणजेच कुशल कर्म घडण्यासाठी मुळ हे चित्तच आहे. त्यासाठीच आपण "मन" ह्या सर्व समस्याच्या मुळावर काम करणार आहोत. मुळाचेच संगोपन करायचे आहे.
धम्मपदातील बालवग्गोमध्ये मुर्खाबरोबर संगती करण्याचे दुष्परीणाम आणि चांगल्या बरोबर मैत्रीचे सुपरीणाम माणसाला भोगावे लागतात असे सांगितले आहे. म्हणून जगामध्ये वावरत असतांना जर स्वत:पेक्षा चांगले अथवा स्वत:सारखे सोबती मिळाले नाही तर दृढतेने एकट्यानेच चांगल्या कामासाठी पुढे चालत राहावे. परंतू मुर्खाशी संगत करु नये.
भगवान बुद्धांच्या शिकवणीचा गर्भितार्थ - "योग्य न्याय"
"न्याय" म्हणजेच भगवान बुद्धांच्या शिकवणींचा गर्भितार्थ होय. कारण भगवंतांचा धम्म शिकवतो की प्रत्येक मनुष्याला त्याच्या कुशल वा अकुशल कर्मानुसार अगदी तंतोतंत मोबदला मिळतो. कितीही क्षुल्लक असो, आणि गुप्तपणे केलेले असो, चांगले कृत्य असो व वाईट असो, कर्माच्या प्रमाणात त्याचा परीणाम तराजूच्या तंतोतंत मापाप्रमाणे न चुकता मिळतो. प्रत्येक अकुशल कर्माचे फळ त्याला मिळतेच. आपला स्वत:चा उद्धार स्वत:च करायला पाहीजे. जोपर्यंत तो तसे करत नाही, तोपर्यंत तो अज्ञानी राहील व तृष्णेच्या बेड्यातून मुक्त होणार नाही.
*जसे बी पेराल तसे उगवेल असे कर्माचा सिध्दांत आहे.* म्हणून व्यक्‍तीच्या मनामध्ये शील, सदाचरणाचे व नितिमत्तेचे बीज पेरणे आवश्यक आहे, तेव्हाच त्याचेकडून चांगले आचरण घडू शकेल. व्यक्ति व्यक्तीच्या मनाला शिस्त लावुन शील, सदाचरणाचे, व नितिमत्तेचे बी पेरण्याचे व त्याचे संगोपन करण्याचे काम बुद्ध धम्म अनुसरण संघ करत आहे ,करत राहील. कारण असत्य *गोष्टींनी भरलेल मन सत्याचा शोध कधीच घेऊ शकत नाही..*
आपण सर्वजण सध्याच्या आपल्या राजकीय, सामाजीक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती बद्दल जाणता. या सर्व समस्यांच्या मुळावरच कुशल कर्म करण्याचे धाडसी कार्य बुद्ध धम्म अनुसरण संघाने हाथी घेतले आहे. संघाला विश्वास आहे की बुद्ध धम्माचे समाजात अनुसरण वाढवल्याने मानवी जीवनाचे कल्याण होणार आहे. त्यामुळे ईतर सामाजीक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक या सर्व समस्यांवर वेगवेगळे काम करण्याची गरज नाही. धम्म अनुसरण हाच मंगल मार्ग आहे. *_संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी बुद्ध धम्माच्या अनुसरणाची गरज आहे_*
_*"बुद्ध धम्म अनुसरण संघ (रजि.)"* हा तथागतांच्या 'संघ' या संकल्पनेवर आधारीत संघ आहे जो कटीबद्ध आहे बाबासाहेबांना अभिप्रेत बौद्धमय भारत निर्मिती कामी तन, मन आणि धन अर्पण करण्यासाठी, समता-बंधुता आणि स्वातंत्र्याचा एक आदर्श समाज घडवीण्यासाठी. अशाच प्रकारचा सम्यक संकल्प घेऊन आपणही सामील व्हा या अराजकीय धम्म चळवळीमध्ये._
*_बुद्ध धम्म अनुसरण संघ ®( BDAS ) परीवार आपणास आवाहन करत आहे की शक्य तितक्या लवकर संघाची संकल्पना समजून घेऊन, सक्रीय सहभागी होऊन ह्या एका अराजकीय धम्म चळवळीला तन, मन आणि धनाने ताकत द्या._*
_क्रांतीकारी जय भीम_
_नमो बुद्धाय.._
📋 *अविनाश पवार*
🔸 *_बुद्ध धम्म अनुसरण संघ ®_*🔸
*"Join BDAS ( बुद्ध धम्म अनुसरण संघ ®) facebook group"*
*_Follow given links .._*
*_( निचे दिए हुए इंटरनेट लिंक पर क्लिक करे )_*
*१) _Maharashtra (महाराष्ट्र ग्रुप )_ :-*
https://www.facebook.com/groups/1657315037853907/
*२) _Gujarat ( गूजरात ग्रुप )_ :-*
https://www.facebook.com/groups/1730250297210150/
*३) _North India (उत्तर भारत )_ :-*
https://www.facebook.com/groups/1720849921502092/
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

Wednesday 2 May 2018

भारत का संक्षिप्त इतिहास
भारत का इतिहास
▶ इंडस वैली ( सिन्धु घाटी ) की सभ्यता ( 3200 BC से पहले )
आज से लगभग पाँच हजार वर्ष पूर्व ( 3200 BC से पहले ) भारत मे इंडस वैली ( सिन्धु घाटी ) की सभ्यता का इतिहास मिलता हैं और यह सभ्यता दुनिया के अग्रणी सभ्यताओं मे मानी जाती थी । यह सभ्यता महान नागवंशियों और द्रविड़ों द्वारा स्थापित की गयी थी जिनको आज एससी, एसटी, ओबीसी और आदिवासी कहा जाता हैं, यह लोग भारत के मूलनिवासी हैं । इंडस वैली ( सिन्धु घाटी ) की सभ्यता एक नगर सभ्यता थी जो कि आधुनिक नगरों की तरह पूर्णतः योजनाबद्ध एवं वैज्ञानिक ढंग से बसी हुयी थी ।
▶ विदेशी आर्य आक्रमण ( 3100BC-1500 )
विदेशी आर्य ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य जोकि असभ्य, जंगली एवं ख़ानाबदोश थे और यूरेशिया से देश निकाले की सजा के द्वारा निकले गए लोग थे । इन युरेशियनों के आगमन से पूर्व हमारे समाज के लोग प्रजातान्त्रिक एवं स्वतंत्र सोच के थे एवं उनमे कोई भी जाति व्यवस्था नहीं थी । सब लोग मिलकर प्रेम एवं भाईचारे के साथ मिलजुल कर रहते थे । ऐसा इतिहास इंडस वैली ( सिन्धु घाटी ) की सभ्यता का मिलता हैं । फिर विदेशी ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य लगभग 3100 ईसा पूर्व भारत आये और उनका यहाँ के मूलनिवासीयों के साथ संघर्ष हुआ ।
▶ वैदिक काल ( 1500-600BC )
युरेशियन लोग ( ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य ) साम, दाम, दंड एवं भेद की नीत से किसी तरह संघर्ष में जीत गए । परन्तु युरेशियनों की समस्या थी कि बहुसंख्यक मूलनिवासी लोगों को हमेशा के लिए नियंत्रित कैसे रखा जाए । इसलिए उन्होंने मूलनिवासीयों को पहले वात्य-स्तोम ( धर्म परिवर्तन ) करवाके अपने धर्म में जोड़ा । फिर युरेशियनों ने मूलनिवासीयों को नीच साबित करने के लिए वर्ण व्यवस्था स्थापित की, जिसमें मूलनिवासीयों को चौथे वर्ण शूद्र में रख दिया गया । समय के साथ यूरेशियन ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्यों ने मूलनिवासियों को वर्ण पर आधारित कानून बना कर शिक्षा ( ज्ञान बल ), अस्त्र-शस्त्र रखने ( शस्त्र बल ), और संपत्ति ( धन बल ) के अधिकार से वंचित कर दिया गया । इस नियम को ऋग्वेद में डालकर और ऋग्वेद को ईश्वरीकृत घोषित कर दिया और इस तरह बहुसंख्यक आबादी को ( ज्ञान बल ), अस्त्र-शस्त्र रखने ( शस्त्र बल ), और संपत्ति रखने ( धन बल ), के अधिकार से वंचित कर मानसिक रूप से गुलाम और लाचार बना दिया गया । इसे वैदिक संस्कृति, आश्रम संस्कृति या ब्राह्मण संस्कृति कहते हैं जो श्रेणीबद्ध असमानता का सिद्धांत पर समाज को चारो वर्णो मे विभक्त करती हैं ।
▶ तथागत गौतम बुद्ध ( श्रमण संस्कृति का उत्थान ) 563 BC-483BC...
तथागत बुद्ध ने वैदिक संस्कृति के विरुद्ध आंदोलन किया और अनित्य, अनात्म एवं दुख का दर्शन देकर वेद के “ईश्वरी कृत” होने और “आत्मा” के सिधान्त को चुनौती दी । उन्होंने वैदिक संस्कृत के “जन्मना सिधान्त” को नकार “कर्मणा सिधान्त” का प्रतिपादन किया और वर्ण व्यवस्था के सिधान्त को नकार दिया और समतावादी और मानवतावादी दर्शन का प्रचार किया । वैदिक संस्कृति के यज्ञों मे पशुओं की बली दी जाती थी । इस तरह के कर्म कांड को भी तथागत गौतम बुध्द ने नकार दिया । तथागत गौतम बुद्ध के मानवीय शिक्षाओं के प्रसार के बाद ब्राह्मणों का वैदिक धर्म बुरी तरह हीन माना जाने लगा था । तथागत गौतम बुध्द ने अपने पुरे जीवन को इस दर्शन को स्थापित करने में लगाया और पुनः श्रमण संस्कृत को स्थापित किया । जो कि मूलनिवासीयों की संस्कृति थी । तब भारतीय इतिहास का सम्राट अशोक का स्वर्ण काल आया ।

▶ प्रथम बौद्ध संगीति’ का आयोजन ( 483BC )....
‘प्रथम बौद्ध संगीति’ का आयोजन 483 ई.पू. में राजगृह ( आधुनिक राजगिरि ), बिहार की ‘सप्तपर्णि गुफ़ा’ में किया गया था । तथागत गौतम बुद्ध के महापरिनिर्वाण के तुरंत बाद ही इस संगीति का आयोजन हुआ था । इसमें बौद्ध स्थविरों ( थेरों ) ने भाग लिया और तथागत बुद्ध के प्रमुख शिष्य महाकाश्यप ने उसकी अध्यक्षता की । चूँकि तथागत बुद्ध ने अपनी शिक्षाओं को लिपिबद्ध नहीं किया था, इसीलिए प्रथम संगीति में उनके तीन शिष्यों - ‘महापण्डित महाकाश्यप’, सबसे वयोवृद्ध ‘उपालि’ तथा सबसे प्रिय शिष्य ‘आनन्द’ ने उनकी शिक्षाओं का संगायन किया ।

▶ द्वितीय बौद्ध संगीति ( 383 BC )....
एक शताब्दी बाद बुद्धोपदिष्ट कुछ विनय-नियमों के सम्बन्ध में भिक्षुओं में विवाद उत्पन्न हो जाने पर वैशाली में दूसरी संगीति हुई । इस संगीति में विनय-नियमों को कठोर बनाया गया और जो बुद्धोपदिष्ट शिक्षाएँ अलिखित रूप में प्रचलित थीं, उनमें संशोधन किया गया ।

▶ तृतीय बौद्ध संगीति ( 249 BC )......
बौद्ध अनुश्रुतियों के अनुसार बुद्ध के परिनिर्वाण के 236 वर्ष बाद सम्राट अशोक के संरक्षण में तृतीय संगीति 249 ईसा पूर्व में पाटलीपुत्र में हुई थी । इसकी अध्यक्षता प्रसिद्ध बौद्ध ग्रन्थ ‘कथावत्थु’ के रचयिता तिस्स मोग्गलीपुत्र ने की थी । विश्वास किया जाता हैं कि इस संगीति में त्रिपिटक को अन्तिम रूप प्रदान किया गया । यदि इसे सही मान लिया जाए कि अशोक ने अपना सारनाथ वाला स्तम्भ लेख इस संगीति के बाद उत्कीर्ण कराया था, तब यह मानना उचित होगा, कि इस संगीति के निर्णयों को इतने अधिक बौद्ध भिक्षु-भिक्षुणियों ने स्वीकार नहीं किया कि अशोक को धमकी देनी पड़ी कि संघ में फूट डालने वालों को कड़ा दण्ड दिया जायेगा ।

▶ चतुर्थ बौद्ध संगीति....
चतुर्थ और अंतिम बौद्ध संगीति कुषाण सम्राट कनिष्क के शासनकाल ( लगभग 120-144 ई. ) में हुई । यह संगीति कश्मीर के ‘कुण्डल वन’ में आयोजित की गई थी । इस संगीति के अध्यक्ष वसुमित्र एवं उपाध्यक्ष अश्वघोष थे । अश्वघोष कनिष्क का राजकवि था । इसी संगीति में बौद्ध धम्म दो शाखाओं में एक हीनयान और दुसरा महायान में विभाजित हो गया ।

   हुएनसांग के मतानुसार सम्राट कनिष्क की संरक्षता तथा आदेशानुसार इस संगीति में 500 बौद्ध विद्वानों ने भाग लिया और त्रिपिटक का पुन: संकलन व संस्करण हुआ । इसके समय से बौद्ध ग्रंथों के लिए पाली भाषा का प्रयोग हुआ और महायान बौद्ध संप्रदाय का भी प्रादुर्भाव हुआ । इस संगीति में नागार्जुन भी शामिल हुए थे । इसी संगीति में तीनों पिटकों पर टीकायें लिखी गईं, जिनको ‘महाविभाषा’ नाम की पुस्तक में संकलित किया गया । इस पुस्तक को बौद्ध धम्म का ‘विश्वकोष’ भी कहा जाता हैं ।

     सम्राट अशोक प्राचीन भारत के मौर्य सम्राट बिंदुसार का पुत्र था और चंद्रगुप्त का पौत्र था । जिसका जन्म लगभग 304 ईसा पूर्व में चैत्र शुक्ल अष्टमी को माना जाता हैं । 272 ईसा पूर्व अशोक को राजगद्दी मिली और 232 ई. पूर्व तक उसने शासन किया । अशोक ने 40 वर्ष राज्य किया । चंद्रगुप्त की सैनिक प्रसार की नीति ने वह स्थायी सफलता नहीं प्राप्त की, जो अशोक की धम्म विजय ने की थी । कलिंग के युद्ध के बाद अशोक ने व्यक्तिगत रूप से बौद्ध धम्म अपना लिया । अशोक के शासनकाल में ही पाटलिपुत्र में तृतीय बौद्ध संगीति का आयोजन किया गया, जिसकी अध्यक्षता मोगाली पुत्र तिष्या ने की । इसी में अभिधम्मपिटक की रचना हुई और बौद्ध भिक्षु विभिन्न देशों में भेजे गये जिनमें अशोक के पुत्र महेन्द्र एवं पुत्री संघमित्रा को श्रीलंका भेजा गया । बौद्ध धर्म के प्रचार-प्रसार के फ़लस्वरुप अशोक द्वारा यज्ञों पर रोक लगा दिये जाने के बाद युरेशियन ब्राह्मणों ने “पुरोहित का कर्म त्यागकर” सैनिक वृत्ति को अपना लिया था । पुष्यमित्र शुंग नाम के एक ब्राह्मण ने घुसपैठ करके मौर्य वंश के 10 वे उत्तराधिकारी “बृहद्रथ” का सेनापति बनकर एक दिन सेना का निरिक्षण करते समय धोखे से उसका कत्ल कर दिया । उसने ‘सेनानी’ की उपाधि धारण की थी । दीर्घकाल तक मौर्यों की सेना का सेनापति होने के कारण पुष्यमित्र शुंग इसी रुप में विख्यात था तथा राजा बन जाने के बाद भी उसने अपनी यह उपाधि बनाये रखी । शुंग काल में संस्कृत भाषा का पुनरुत्थान हुआ तथा मनुस्मृति के वर्तमान स्वरुप की रचना इसी समय में हुई । वैदिक धर्म एवं आदेशों की जो अशोक के शासनकाल में अपेक्षित हो गये थे को पुनः कठोरता से लागू किया । इसी कारण इसका काल वैदिक प्रतिक्रांति अथवा वैदिक पुनर्जागरण का काल कहलाता हैं । पुष्यमित्र शुंग ने घोषणा किया जो बुद्धिस्ट भिख्खु ( Monk ) का सिर लाकर देगा वो उसे 100 सोने की सिक्के देगा । बौध्दों का बहुतही कत्ले आम हुआ ।

श्रमण संस्कृत के मानने वाले चार वर्ग मे विभक्त हो गए —
1 ) जो उनकी अधीनता स्वीकार कर लिए वो सछूत शूद्र बने अर्थात आज का ओबीसी ( OBC ) !
2 ) जो लड़ाई से दूर जंगल और पहाड़ मे चले गए अर्थात आज का अनुसूचित जन जाति ( ST ) !
3 ) जो ब्राह्मणवाद के सामने नहीं झुका वो है आज का अछूत अतिशूद्र अर्थात अनुसूचित जाति SC !
4 ) जो आज भी ब्राह्मणवाद के आगे नहीं झुके हैं और जंगलों में रहते हैं अर्थात आदिवासी !

     मनुस्मृति की रचना के बाद ब्राह्मणों ने एक बहुत बड़ा जातिप्रथा नाम का षड्यंत्र रचा और फिर इस बार मूलनिवासीयों ( SC, ST, OBC ) को 6743 जातियों, टुकडों में तोड़ कर जन बल से भी वंचित कर दिया गया । ऐसा तंत्र तैयार किया गया कि इसको तोड़ना अत्यंत कठिन रहें । और उनमे श्रेणीबध्द असमानता का सिद्धांत अर्थात जातिव्यवस्था का सिद्धांत, लागु किया और उनको धर्म, वेदों एवं शास्त्रों के माध्यम से मानसिक रूप से गुलाम बनाया ।

     उसके बाद समय समय पर ब्राह्मणों ने बहुत से धर्म शास्त्रों की रचना करके जो अंधश्रद्धा और अन्धविश्वास पर आधारित लिखें हैं और उनको मूलनिवासीयों पर जबरदस्ती धर्म के नाम पर थोप दिया गया हैं । इस प्रकार हम देखते है कि धर्म ही मूलनिवासीयों की गुलामी का मुख्य आधार हैं यही वो षड्यंत्र हैं जिसके कारण आज भी मूलनिवासी बहुजन समाज मानसिक तौर से गुलाम हैं । ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य आज भी इसी षड्यंत्र के माध्यम से देश पर राज कर रहे हैं ।

     इतिहास में हजारों मूलनिवासी महापुरुष हुए जिन्होंने मानवता पर आधारित मानव जीवन की शिक्षा दी, लेकिन किसी भी महापुरुष ने ना तो कोई धर्म बनाया और ना ही किसी धर्म की कभी  बात की । हमारे मूलनिवासी महापुरुष जानते थे कि धर्म का सही अर्थ सिर्फ शोषण हैं । रविदास, नानक, कबीर, ज्योतीराव फुले, नारायण गुरु, पेरियार, सावित्री बाई फुले और बाबासाहब डा. भीमराव अम्बेड़कर ने कोई भी धर्म नहीं बनाया । मूलनिवासी महापुरुष जानते थे कि अगर हम कोई धर्म बनाते हैं तो यह वही बात हो जायेगी कि लोगों को एक अंधे कुए से निकल कर दूसरे अंधे कुए में धकेल देना । कोई भी महापुरुष मूलनिवासी लोगों को अंधश्रध्दा और अविश्वास के कुए में नहीं धकेलना चाहता था । बाबासाहब डा. भीमराव अम्बेड़करजी ने अपने जीवन काल में धर्म का त्याग करके धम्म को अपनाया क्योकि बाबासाहब डा. भीमराव अम्बेड़करजी जानते थे कि आडम्बरों, पाखंडों और ढोंगों पर आधारित धर्मों से कभी भी मूलनिवासीयों का भला नहीं हो सकता । इसीलिए बाबासाहब डा. भीमराव अम्बेड़करजी ने धर्म छोड़ कर बुद्धि और तर्क पर आधारित बौध्द धम्म को अपना कर सन्देश दिया ।

     सभी मूलनिवासीयों से प्रार्थना हैं कि धर्म का त्याग करे और बौद्ध धम्म को अपनाये । शायद कुछ लोग यहाँ तर्क भी करेंगे कि हम बौध्द धम्म को ही क्यों अपनाये तो उन लोगों से प्रार्थना हैं कि फालतू में सोच कर या तर्क करके अपना समय और उर्जा खर्च ना करें । आप सभी को ज्ञात ही हैं कि जब तक हम ब्राह्मण निर्मित धर्म में रहेंगे हम शुद्र, नीच आदि कहलाते रहेंगे । आप सभी धर्म को छोड़ दे और मानवीय मूल्यों के आधार पर जीवन जीना शुरू कर दे । जब आप सभी लोग धर्म को त्याग कर मानवीय मूल्यों पर आधारित जीवन जीना शुरू करेंगे तो निश्चय से ही देश के मूलनिवासीयों का भला ही होगा ।

जागों मूलनिवासी बहुजनों जागों...!

1 मे, जागतिक कामगार दिन/महाराष्ट्र दिन - कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य


कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय, घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच, पण ह्या कार्याबरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी भारतीय कामगार व कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

------------------------------------
*1 मे, जागतिक कामगार दिन/महाराष्ट्र दिन*
--------------------------------------
कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान खालील प्रमाणे आहे
१) शेतकर्यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली

२) १९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासंबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.

३) १९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.

४)  वरील बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली.

५) १९३८ मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.

६) बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला.

७) २ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्रीमंडळात कामगार मंत्री झाले. ह्या कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले.

८) २ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.

९) युध्द साहित्य निर्माण करणार्या कारखान्यात एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन केली.

१०) सेवा योजन कार्यालय ( Employment Exchange ) ची स्थापना केली.

११) कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.

१२) कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच `किमान वेतन कायदा १९४८’ ची निर्मिती झाली.

१३) औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली.

१४) सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते.त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण,सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले.

१५) ३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले.

१६) ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदार्या यावर विचारविनिमय करणार्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी मौलिक सूचना केल्या.

१७)  ८ एप्रील १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्यासंबंधीचे बिल संमत केले.

१८)  ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.

१९) `भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंतमध्ये काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.

२०) ‘दि.माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर) रजा देण्याची शिफारस केली.

२१) ‘दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली.

२२)  १९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १० तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.

२३) अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली.

२४) २१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड) ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्यासंबंधीचे विधेयक मांडले.

२५) १९ एप्रील १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर झाले.

२६) बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड) नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणार्या स्त्रियांनाही मिळावा अशी घटनात्मक तरतूद केली.

२७) घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.

२८) कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तरतूद केली.

आज Factory तील कामगार आणि कॉर्पोरेटमधील अधिकारी

सर्वानी बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनसंघर्ष विसरता कामा नये.

जय भीम..! जय संविधान..!