Monday 15 February 2016

"" योद्धा महार""

महार ही जात प्राचीन काळापासूनच लढवय्यी, शूरवीर, कर्तबगार, पराक्रमी आहे. त्यांची पराक्रम बघून भल्याभल्यांचा थरकाप उडायचा म्हणूनच प्राचीनकाळी त्यांना महा + अरि म्हणजे मोठा शत्रू अशा विशेषणाने संबोधले जायचे पुढे या विशेषणाचा अपभ्रंश होऊन महार झाले. त्यांच्या या पराक्रमी वृत्तीमुळे कालांतराने त्यांच्यावर अंकुश असावा म्हणून धर्माच्या नावाखाली सामाजिक बंधणे घालून, अन्याय करून शक्तिहीन करण्याचे प्रयत्न केले गेले.
अलिकडच्या इतिहासात पाहले तर शिवरायांचे काळा महारांनी अनेक लढायात पराक्रम करून स्वराज्याच्या स्थापनेत आपले भरीव योगदान दिले होते.
शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा किल्लेदार रायनाक महार होता तसेच दुसर्या महत्वाच्या रोहीडा किल्ल्याच्या नाईक पदाची जिम्मेदारी कालनाक महार व सोंडकर महार यांच्या पदरी होती.
संभाजी राजेची बर्हाणपुरात धिंड काढल्याने पाहून एकटाच बंड संभाजी राजेंच्या आजूबाजूचे 15-20 गनिम कापणारा रायप्पा महार आणि संभाजी राजेंच्या हत्येनंतर पेटलेल्या संग्रामात मोगलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीच्या महार व मौजे वेलंग चे सिदनाक महार होते. यानंतरही मराठे व पुढे पेशव्यांनी चालवलेले राज्य हे स्वराज्य आहे म्हणून त्याकडे वाकड्या डोळ्याने पाहणार्या मुघल व ब्रिटीश फौजे विरूध्द तळहातावर शिर घेऊन लढणारे कित्येक योध्दे महार जातीचेच होते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनी पेशव्यांना अनेक लढाया जिंकून दिल्या. तरीसुद्धा पेशवे ब्राह्मणी अहंकारामुळे शुरवीर महारांचा सदैव अपमान व अवहेलनाच करायचे.
शिदनाक महार व त्यांच्या सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे माधवराव पेशव्याला खर्ड्याच्या विजय प्राप्त झाला परंतु त्याकडे दुर्लक्ष करून विजयाच्या उन्मादात ब्राम्हणांनी त्याच रणांगनावर शिदनाक व त्यांच्या महार सैनिकांचा अपमान केला.
प्रत्येक लढाईतील महारांचा पराक्रम व त्यांच्यामुळे मिळणारे यश पाहून पेशव्यांचा उर धपापल्या जायचा आणि याचमुळे त्यांना महारांची धास्ती वाटायची. कदाचित 'आपण जसे शिवरायांचे राज्य बळकावले तसे महारांनी आपले राज्य हिरावून घेतले तर....... ही भिती वाटत असावी शेवटी चोराच्या मनात चांदणे.
केवळ याच कारणामुळे इतर अतिशूद्र जातींपेक्षा महार जातीचा पेशवे अतिशय द्वेष करायचे म्हणून महारांना काबूत ठेवण्यासाठी कोकणस्थ ब्राम्हण पेशव्यांनी सत्ता व धर्माच्या जोरावर महारांवर कडक बंधने घातली. महारांचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेतले. महार, मांग, चांभार अतिशुद्र व अस्पृश्य म्हणून गावकुसाबाहेर राहण्यास बाध्य केले. त्यांनी कसे रहावे, कसे वागावे, काय करावे याबद्दल विशेष नियम केले आणि मनुस्मृती प्रमाणे त्या नियमांचे कायदे केले. त्या कायद्यांचे उल्लंघन करणार्यांना कडक शिक्षा देण्याचे फरमान काढण्यात आले.
हे कायदे कोणते होते
● अस्पृश्यांना स्पर्श करणे पाप आहे त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू देऊ नये
● अस्पृश्यांना गावामध्ये दिवसा गावबंदी. प्रवेश करावयचाच असेल तर त्यांनी सूर्योदयापूर्वी आणि सुर्यास्तानंतरच करावा
● अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी भरण्यास बंदी, देवदर्शनास बंदी, देवळाच्या पायरीवर चढण्यास बंदी, शिक्षणास बंदी.
● अस्पृश्य समाजाच्या लोकांनी थुंकण्यासाठी गळ्यात मडके व रस्त्यावरून चालताना उमटलेल्या पाऊलखुणा व रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू बांधण्याची सक्ती.
● ब्राम्हण दिसताच अस्पृश्यांनी त्वरित खाली बसून पालथे पडावे.
● दुसर्या बाजीराव पेशव्याच्या काळात महार किंवा मांग तालीमाखान्यापुढून जातांना दिसला तर गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे
या अमानवीय कायदे व अत्याचाराबद्दल ब्रिटीश सेनापती फोर्बेस ने लिहिले आहे की, "त्या गरीब व जातीबाहेर फेकण्यात आलेल्या चांडाळाच्या स्थितीचे वर्णन मी कशा प्रकारे करू?. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. गावात त्यांना सकाळी नऊ च्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे. त्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच्छ व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. त्यांची दारुण अवस्था बघितली की माझे अश्रू आवरणेही मला कठीण होत असे. मी माझ्या क्षेत्रात या अस्पृश्यांची सुधारणा करण्याचे प्रयत्न केले पण वरिष्ठ जातीच्या मनात अस्पृश्यतेबद्दल इतके खोलवर रुजलेले गैरसमज आहेत की माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले." (बॉम्बे गॅझेटियर 1884-85)
ब्राम्हण पेशवे महारांची रणांगनावरील कर्तबगारी व पराक्रम बघून महारांचा द्वेष करायचे तरी महारांच्या पराक्रमावर आणि शौर्यावर राजवाड्यातील ब्राम्हण बायका भाळून जायच्या यामुळे त्यांच्यामधील काही स्त्रियांचे महारासोबत प्रेमप्रकरणे चालायची यातील एखादे प्रकरण उघडकीस आले तर त्या महाराचा खून केल्या जायचा गणपत महाराचा खून याच कारणासाठी केल्या गेल्या होता. अशाच प्रकारे खून करण्यात आला होता.
पेशवाईत महारवर कोणीही अन्याय कोणीही अत्याचार करायचे आणि पर्याय नसल्याने त्यांना तो निमुटपणे सहनच करावा लागायचा. केवळ अन्याय करूनच पेशव्यांचे समाधान झाले नाही म्हणून महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुद्धा त्यांनी सुरु केली. इमारतीच्या पायात, किल्ला, किल्ल्याचा बुरुज, पूल, तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. “महार-मांगाला पायभरणीत पुरले” असे शब्दोल्लेख आजही अनेक लोककथेत ऐकायला मिळतात.
एवढे असूनही इंग्रज पुण्यावर चाल करून येत असल्याचे समजताच लढाईची परवानगी मागायला रायनाक, सिधनाक सारखे वीर शनिवारवाड्यावर गेले तेव्हा नाचगाण्यात दंग असलेल्या पेशव्यांचा रसभंग झाल्याने त्यांनी त्यांना पेशव्यांचे राज्य महार-मांगाच्या भरवशावर नाही म्हणून अपमानित करून हाकलून दिले आणि मग मात्र महारांचा स्फोट झाला. आतापर्यंत झेललेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महारांचे हात शिवशिवू लागले चाणाक्ष इंग्रजानी महारांना जवळ केले आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत 1 जानेवारी 1818 रोजी 500 महार भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या 25,000 सैन्यासोबत प्राणपणाने लढले आणि पेशव्यांच्या अफाट व सुशस्र सैन्याची धूळधाण करून त्याना पळती भुई कमी केले गर्वान्ध पेशवे महारांपुढे चारी मुंड्या चीत झाले. महारांच्या अविस्मरणीय शौर्याची व पेशव्यांच्या नाचक्कीची इतिहासात नोंद झाली. पेशव्यांची उरली सुरली इभ्रत महारांनी सोलापूर व आष्टीच्या काढली आणि पेशवाई नेस्तनाबूत केली तेव्हा कुठे महार मांग जातीवरील अमानवीय छळाचा महारांच्या उरातील ज्वालामुखी शांत झाला.
बाबासाहेब म्हणायचे, " गुलामाला त्याच्या गुलामगिरीची आठवण करून द्या जेणेकरून तो बंड करून उठेल "
जय जिजाऊ..जय शिवराय.. जय शंभूराजे.. जय भिम.. जय भारत..!

No comments:

Post a Comment