Thursday, 16 March 2017

बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांचे विचार..

बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांचे विचार..........

•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल.

•तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म पाहिजे पण धर्माच्या नावावर ढोंगीपणा मला नको आहे.

•बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असुन तो शेवटपर्यंत साधा मनुष्य राहिला व त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान आहे, त्याने जन्मतः अलौकिक असण्याचा आव आणला नाही की अलौकिक चमत्कार
करण्याची शक्ती आपल्या अंगी असल्याचे भासवुन जनतेला केव्हाही फसविले नाही

•दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही, परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कराव हाच एक उपाय.

•बौद्ध धम्म महासागरासारखा आहे. त्यात कोणत्याही प्रकाराचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करुन त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला.

•बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाचा विश्वास नव्हता.

•भगवान बुद्धांनी जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी धर्म स्थापिला. इतर धर्म देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसामाणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्वांनुसार जोडणारा बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे.

•बुद्धाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही असे बुद्धाचे सांगणे आहे. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे.

•बौद्ध धर्माचा वृक्ष भारतात अद्यापही जिवंत आहे. फक्त त्याचा पाला सुकलेला आहे. अशी माझी खात्री आहे कि या वृक्षाला खतपाणी घातले तर हा वृक्ष पुन्हा फोफावेल.

•बौद्ध धर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही.

•मी बौद्ध धम्माचे चक्र पुन्हा गतिमान करेन, माझ्या गुरुचा उपदेश दाही दिशांत पसरवीन.

•बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातीभेद नाकरते म्हणुन मला ते आवडते. बुद्धांनी केवळ जातीव्यवस्थेविरुद्ध हत्यार उपसले नाही, तर तर आपल्या संघात शुद्रातिशुद्रांना सन्मनाने जागा दिली.

•बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठीच शोधली आहेत यातील जवाहिरांचा मुक्त वापर करा.

•सागरामध्ये मिळाल्यावर ज्याप्रमाणे गंगा नदीचे पाणी ओळखणे अशक्य असते त्याचप्रमाणे बौद्ध धम्मात आपल्या जाती नष्ट होवुन सर्व समान होतात. असे सांगणारे एकच महापुरुष होत आणि ते म्हणजे भगवान बुद्ध.

•भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय.

•बौद्ध धम्माच्या दृष्टीने सध्याची भारतातील स्थिती शुन्यवत आहे. त्यासाठी आपण धम्माचे चांगल्या प्रकारे पालन करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, कारण बौद्ध
धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांती राहणार नाही.

•जगाचे कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. त्या धम्माचा आदी, मध्य व अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असा आहे.

•बुद्धाने सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वांतत्र्याचा पुरस्कार केला आहे. तसेच केवळ माणसामाणसातील समानता नव्हे, तर स्त्री आणि पुरुष यांच्यातही त्याने समानता प्रस्थापित केली आहे.

•बौद्ध धम्माचा जीवनमार्ग चिरंतन आहे, तो पुर्ण लोकशाहीवादी आहे. बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते. बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासुन परावृत्त करण्याचे
आहेत. मनुष्यमात्राचे दुःख नि निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धत सांगीतली आहे ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

•बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही.  म्हणुनच बौद्धधम्म हा मानवधम्म आहे, मानवाच्या संपुर्ण विकासासाठी तो प्रयत्नशील आहे. तो आमच्यासारख्या
आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला पटकन पटु शकतो. बुद्धाची शिकवण अगदे साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धम्मामध्ये मनुष्यास पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सदसद्विवेक बुद्धीला
पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत.

•बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्येही आहे. बौद्ध धर्मातील भिक्षुप्रमाणे कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी वस्तु ठेवण्याचा अधिकार आहे. संघामध्ये प्रत्येक भिक्षुला सातच वस्तु ठेवण्याचा अधिकार असतो.

•बौद्ध धर्म व हिंदु धर्म यांची तुलना केल्यास आपणास असे दिसुन येते कि बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा असुन हिंदु धर्माचा पाया कर्मकांडांचे आचरण हाच आहे. स्नानसंध्या, जपजाप्य, सोवळेओवळे व यज्ञयाग यात हिंदु धर्म सामावलेला आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजेच बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्मात देव नाही ही करी गोष्ट आहे. देवाची जागा बौद्ध धम्मात नैतिक आचरणाने भरुन काढलेली
आहे.

•बुद्धाने अहिंसेबरोबरच इतर अनेक गोष्टींचाही हिरीरीने पुरस्कार केला आहे. हि गोष्ट विसरता कमा नये. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचाही बुद्धाने
पुरस्कार केलेला आहे. बौद्धधर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी साजेसा असा धर्म असुन तो इहलोकीच मनुष्यमात्राला मुक्त करण्यास सर्वतोपरी समर्थ असाच धर्म आहे. म्हणुन मेल्याशिवाय स्वर्ग न दिसु देणाऱ्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा तो केव्हाही श्रेष्ठच ठरणार.

•बौद्धवाद व ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हास सांगत आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करायची आहे. बुद्ध हा मानव होता. बुद्धाची तत्वे जातीवर्गाविरुद्ध होती. बुद्धाने सामाम्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टीकोनातुन जनतेची दुःखे दुर करण्याचा प्रयत्न केला.

•साऱ्या भारत देशाने बौद्ध धर्म स्विकारावा. बौद्ध धर्म व हिंदु धर्म एकच आहे ही गोष्ट खोटी आहे. त्यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे.

•बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदु धर्मातील मते आणि दैवते बौद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही.

•नवीन झालेल्या बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे कि त्यांनी दर रविवारी बौद्ध विहारात गेले पाहिजे असे जर झाले नाही तर नवी बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही.
यासाठी ठिकठिकाणी बुद्ध विहारे निर्माण झाली पाहिजेत. विहारात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, थायलंड इत्यादी देशातील भिक्षुंनी पुढाकार घेऊन
पैसा गोळा करावा व भारतातील बौद्ध लोकांना मदत करावी.

•बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व रामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील यात शंका नाही.

•बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या मंडळींना बौद्ध म्हणुनच संबोधले पाहिजे. बौद्ध धम्मात नवबौद्ध असा वेगळा पोटभेद किंवा वेगळी जमात नाही. बौद्ध धम्मेय म्हटला की तो सर्व एकच होय. बौद्धांत नवा बौद्ध आणि जुना बौद्ध असा प्रकारच नाही. बौद्ध तेवढे सारे एका बौद्ध नावानेच ओळखले जातात, अशी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे विद्वाण, जाणते यांनी भारतीय नव-दीक्षित बौद्धांना नव-बौद्ध म्हणणे सर्वस्वी चुक आहे. या समाजाला बौद्ध असेच म्हटले पाहिजे.

•बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही.

•बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. तो केवळ धर्म नसुन तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे.

•बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मानवी मुल्ये या धर्माने स्वीकारली आहेत. कर्मकांड, जातीभेद यांना बुद्धाने नकार दिलेल आहे. त्यांच्या धम्माचा प्रमुख हेतु ऐहिक जीवनात मनुष्याला सुख शांती, आनंद प्राप्त व्हावा हा आहे.

•बुद्धाचा धर्म म्हणजे नीती. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे. जर धर्म चालु राहावयाचा असेल तर तो बुद्धिप्रामाण्यवादी
असला पाहिजे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे.

•मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात तीन तत्वे सापडत नाही, ती मला बौद्ध धर्मातच सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवितो. तो अंधश्रद्धा नि
अद्भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्वे शिकवितो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करु शकत नाही. मार्क्सवाद आणि
साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरुन टाकले आहेत.

•बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पुर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवुन आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवुन आणतो.

•मला कोणी अंधभक्त नकोत. बौद्धधर्मात ज्यांना यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने यावे. तो धर्म बुद्धीला पटला पाहिजे. ज्यांना माझ्याबरोबर यायचे नाही त्यांना कुठेही जायला मोकळीक आहे.

•बुद्धाची शिकवण कार्यकारणभाव व अनुभव यावर आधारलेली असल्यामुळे त्याचे अनुयायी त्याच्या शिकवणुकीत योग्यवेळे व अटळ परिस्थीतीत अमलात आणता
येत नसेक तर तिच्यामध्ये दुरुस्ती किंवा तिचा संपुर्णतया त्याग करण्यास स्वतंत्र आहेत. बुद्धधर्म नैतिकतेवर आधारलेला आहे. सामाजिक गरजांच्या पोषणातुन निर्माण झालेली नैतिकता ही एक बाह्य शक्ती आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे
नैतिकतेशिवाय दुसरे काहीच नाही.

•बौद्ध धर्माचा इतिहास म्हणजे एक तृतीयांश मानवजातीच्या गेल्या अडीच हजार वर्षातल्या सुधारणेचा इतिहास आहे.

•बुद्धाचा मार्ग अधिक व्यावहारिक आहे. दुःख आहेच, मात्र ते जाणण्याची शक्ती माणसाचे ठायी असली म्हणजे झाले. सारांश, बुद्धाचा धर्म हा विशेषतः मानवी आहे, दैवी नाही.

•हिंदु लोकांना आपले राष्ट्र जगवायचं असेल तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे.
•बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्यच होय. एवढी गोष्ट कोणत्याही देशातील लोकांनी लक्षात ठेवली म्हणजे पुरे आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करणे म्हणजे
मानवसेवा करणे होय. हा विश्वास ठेवला म्हणजे कार्य यशस्वी होणार.

•बौद्धधर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरीता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे. हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारुन चालणार नाही, तर
देवांनीसुद्धा त्याचा स्वीकार करावयास पाहिजे.

•बौद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही, सर्वत्र समसमानता आढळुन येईल.

•आता बौद्ध धर्माची लाट आली, तर ती कधीही परत जाणार नाही. धर्म स्थापनेसाठी देवळाची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु स्वकष्टाने मला एक देऊळ बांधावयाचे
आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल. पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवुन देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या पराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही.

•बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.

•आपला महाराष्ट्रसुद्धा शंभर टक्के बौद्धमय होता आणि त्याला पुरावा म्हणुन महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील, भारतातील
दीडहजार लेणी महाराष्ट्रातच आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षुंची राहण्याची ठिकाणे होती. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत असे सांगण्यात आले, परंतु विराट नगरी कोठे आणि पांडवांचे राज्य कोठे?

•माझे आयुष्य थोडे राहिले आहे. दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्याकडुन कदाचित पुर्ण झाली नसतील, पण मी निश्चय केला आहे. इतर कार्यातुन मी निवृत्त होणार आहे, मला आता बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे.

•बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे शुद्ध आचरण करणारे पाचच अनुयायी मिळाले तरी पुष्कळ
झाले.

•बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे, तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजाने तो स्वीकारुन चालणार नाही, तर साऱ्या भारताने व त्याचबरोबर साऱ्या जगानेही बुद्धाचा धर्म स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे.

•बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल.

•मानवतेचे संपुर्ण संरक्षण करण्यासाठी भारतालाच काय पण सार्या जगाला शेवटी बुद्ध धर्माची कास धरावी लागेल.

•बौद्धकाळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशांतील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापुर्वी कधीही असा गौरव भारतास प्राप्त नव्हता.

•माझा गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीपासुन ते मी काढले आहे, माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस क़्हार उच्च स्थान आहे.

•मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडके अडकवुन घेत आहोत असे मानु नका. बौद्धधर्माच्या दृष्टीने भारताची भुमी सध्या शुन्यवत आहे. आपण महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीला आणला असे होवु नये, म्हणुन आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण
आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.

•जर लोक पुन्हा बौद्ध धर्माचा अंगीकार करतील तर आपला पुन्हा वैभवाप्रत गेल्याशिवाय राहणार नाही.

•बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था व जातिभेद नाकारीत आहे, म्हणुन मला ते आवडते.
•बौद्ध धर्म हाच जागतिक ऐक्याचा एकमेव, अद्वितीय असा धर्म आहे.

•बुद्धाने चार वर्णांवर कु-हाड चालविल्यामुळेच ब्राह्मण त्याचा द्वेष करु लागले, हीच खरी वस्तुस्थिती आहे.

•भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले- मी सांगतो म्हणुन हा धर्म घेवु नका. व्यवहारात हा धर्म चालु शकेल असं वाटलं तरच घ्या. तुमच्या बुद्धीला पटला तर हा धर्म माना. एकजिवाने, एकचित्ताने आपणास गेले पाहिजे. याच मार्गाने आपला उद्धार होईल.

•बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्यांच्यासारखा विचारवंत अजुन पर्यंत जगात झालाच नाही.

•खरोखरच कोणाला जज्ती मोडावयाच्या असतील तर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करावा हा एकच उपाय आहे.

•बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये समाजसुधारणा आहे हे माहीत झाले तर जगातील मानवाला बौद्ध धम्माविषयी आकर्षण वाटेल.

•भगवान बुद्ध जेवढे प्रज्ञावंत होते, त्यांच्या एका दशांशाने जरी आपण जागृत झालो तरी देखील करुणा, न्याक्ष व सदिच्छेने आपल्या हातुन जनहिताचे कार्य होईल.
•माझा सर्व बौद्ध जनांना असा सल्ला आहे कि त्यांना जगात सन्मानाने जगावयाचे असेल तर भगौआन बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यांनी जास्तीत जास्त  अभ्यास करावा.

•धर्मरचाराचे कार्य करावयाचे असेल तर बुद्धाची शिकवण गोरगरीब लोकांच्या कानावर, मनावर सतत बिंबवली पाहिजे.

•आपण भगवान बुद्धाच्या धर्माचा विचार करु. भगवान बुद्धाने जगाला सर्वात श्रेष्ठ असे कोणते तत्त्व सांगितले असेल तर ते हे कि, मनाची स्वच्छता ठेवा. या द्येयाचे मनाची सुधारणा केल्याशिवाय जगाची अगर मानवाची सुद्धारणा होणार नाही.

•बौद्ध धर्म हा निव्वळ धर्मिक विधीचा धर्म नसुन समाजजीवनाचे तत्त्वज्ञान आहे.

•बुद्धाच्या शिकवणीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व सामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील. बुद्ध धर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी समर्थ बनवणारा असाच धर्म
आहे.

•बुद्धाव्यतिरिक्त सर्व धर्मसंस्थापकांनी आपण मोक्षदाते आहोत अशी भुमिका स्वीकारली; उलट बुद्धाने स्वतःला कोणतेही दैवी वलय न लावता मार्गदाता म्हणुन संबोधिले. बुद्धाचा धर्म हा नीतिधर्म आहे.

•भगवान बुद्धाने त्याचा शिष्य आनंद याला मृत्युपुर्वी केलेला उपदेश लक्षात ठेवावा असे म्हटले. हे आनंदा, तुम्हीच तुमचा प्रकाश व्हा. तुम्हीच तुम्हाला शरण जा. सत्य हाच तुमचा दीप आहे. स्वतःशिवाय दुसऱ्याकडे जाऊ नका.

•भगवान बुद्ध मुक्ती देण्याचे वचन देत नाहीत. ते म्हणतात की मी मार्गदाता, मार्गदर्शक आहे. मोक्षदाता नाही.

•माझ्या धम्माचा 'माणुस' हा केंद्रबिंदु आहे आणि या जगात माणसामाणसाशी त्यांच्या जीवनात नाते असणे ही केंद्रप्रवृत्ती आहे. ही भगवान बुद्धांची पहिली शिकवण होय.

•जातिभेदावर कुर्हाड घालुन अस्पृश्यतेचे पाप मुळातच मारुन टाकणारा जर एखादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा भगवान गौतम बुद्धच होय.

•जाती नाहीत, असमानता नाही, वरिष्ठपणा नाही, कनिष्ठपणा नाही. सर्व समान आहेत. हे भगवान बुद्धाचे तत्व आहे.

•धर्मांतर हे जबरदस्तीने किंवा सक्तीने करता येणे शक्य नाही. याबाबतीत भीड घालणे योग्य नाही व तिचा उपयोगही होणार नाही. धर्मांतर हे आपल्या मनाला पटले तरच करायचे असते.

•बौद्ध धर्माच्या शुद्ध तत्त्वांच्या बरोबरच ब्राह्मणी तत्वे वाहु देता कामा नये.

•माझी बौद्ध धर्माची कल्पना वेगळी आहे, या धर्मात वकील, बॅरिस्टर, प्रधान, मंत्री होतील अशी तरतुद हवी आहे.

•ज्याप्रमाणे ऊस हा मुळातच गोड असतो त्याचप्रमाणे बौद्ध धर्म सुरुवातीपासुनही कल्याणकारक आहे, मधेही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे. या धर्माचा आदि, मध्य व अंत हे सर्वच गोड हितकारक व कल्याणकारी असे आहेत.

•आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बौद्ध धर्माची लाट परतवुन लावली. परंतु आता मात्र बौद्ध धर्माची जी लाट येईल, ती कधीही परत
जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल पण ओहोटी कदापि येणार नाही.

•बौद्ध धर्म मला पटला व तो मी उचलला. राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत. खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री सुद्धा होऊ शकेन, पण हे मला नको आहे. राजकारण हा क्रिकेटसारखा खेळ नव्हे. तो एक संप्रदाय आहे. रामानंदी, कबीर पंथी माणसाला तु पंथ सोड असे सांगितल्याने तो आपला पंथ सोडणार नाही. त्याचप्रमाणे माझा बौद्ध धर्म देखील अटळ आहे. हा धर्म मी एकदा स्वीकारला, मग मला आता त्या मार्गानेच गेले पाहिजे.

•बुद्ध तत्त्वज्ञानाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शुद्रातिशुद्रांना उच्चपद प्राप्त करुन दिले होते. त्याकाळी अनेक शुद्र राजे झाल्याचे दाखले आहेत.

•बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक वृत्तीच्या मनाला बुद्धाच्या धम्माइतका दुसरा कोणताच धर्मविचार आकर्षित करु शकत नाही.

•भगवान बुद्धांची शिकवण आणी सिद्धांत आधुनिक, बुद्धीसंगत व सदैव समकालीन आहेत, काहीच कट्टरपणा नाही. तुमचे जीवन विवेकपुर्ण असावे हिच बुद्धाची शिकवण आहे.

•जगाला भारताची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण होय. भारत देश हा याच जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभुमी म्हणुन ओळखला जातो.

"जातींचा नाईनाट कसा होईल?"

"जातींचा नाईनाट कसा होईल "
Annihilation of caste


वर्णाश्रमासोबत हिंदूंना ब्राम्हणांनी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे जात होय. भारतात एकूण ६५०० पेक्षा अधिक जाती असून त्यातही अस्पृश्यांच्या जवळपास १००० जाती आहेत.या जातीपैकी महाराष्ट्रात ५९ जाती आहेत. त्यात मुख्यता चार प्रमुख जाती आहेत. १) महार  २) चांभार  ३) मांग ४ ) भंगी / मेहतर. महाराचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या ७ % आहे. ब्राम्हणांइतकेच या कनिष्ठ जातींवर अधिक हक्क गाजविणारे कुणबी, तेली, माळी आदी जाती आहेत. जातीच्या निर्मितीत जेव्हा शुद्र वर्णाच्या अन्यायाला चिडून प्रतीरोध दर्शविला गेला तेव्हा या विरोधी लोकांना शांत करण्यासाठी ब्राम्हणांनी जातीच्या सुधारणेत बदल करून या प्रतीरोधींना तेली, कुणबी, माळी आदी जातीत परावर्तीत केले. यां जातींना कनिष्ठ जातीवर वर्चस्व जरी दिल्या गेले तरी श्रेष्ठत्व मात्र ब्राम्हणांनी स्वत:च्याच अधिपत्यात ठेविले. आजही तेली, कुणबी स्वत:ला महार, मांग, चांभार, भंगी, मेहतर यांच्यापेक्षा श्रेष्ठ जातीचे समजतात आणि ब्राम्हणांईतकेच कनिष्ठ जातीवर अन्याय करण्यात पराक्रम दाखवितात, त्यांना हीन समजतात. ब्राम्हणांपेक्षाही ब्राम्हणेतर जाती त्यांच्या पेक्षा कनिष्ठ जातींवर अन्याय अत्याचार करतांना दिसून येतात.

             या देशाची मुख्य समस्या जर कोणती असेल तर ती जात आहे असे प्रतिपादित करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्माण होण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर बाबासाहेबांनी Annihilation of caste  आणि  caste in india  ही पुस्तके लिहलीत. त्यावेळी जरी बाबसाहेबांच्या ‘जातीचा संपूर्ण नायनाट’ या मताला महत्व दिल्या गेले नसले तरी बाबासाहेबांनी केलेल्या अनेक भाकीतांपैकी, हे भाकीत सुद्धा आता सत्यात उतरले आहे. १९३६ ला त्यांच्या  Annihilation of Caste या पुस्तकाच्या दीड हजार प्रती काही अवघ्या दिवसातच खपल्या गेल्या होत्या हे मात्र विशेष.

             नुकताच भारताप्रती अमेरिकेने भारताचे सर्वेक्षण करून भारताची मुख्य समस्या जात (caste ) आहे असा अहवाला दिलाय. इतकेच नाही तर भारत कधीच विकसित राष्ट्र होणार नाही असेही या अहवालात दर्शविण्यात आले आहे. कारण भारतासमोर अनेक धर्म, धर्मातील जाती, भ्रष्टाचार, लोकसंख्यावाढ, आतंकवाद, बेकारी, गरीबी, निष्क्रीय जनता आणि त्यांचे सरकार, लोकांची अकार्यक्षमता, फालतुचे संस्कार, परंपरा, अनावश्यक संस्कृत्या, विभूतीपुजा देव आणि त्यांची देवळे, देशाप्रती असलेली अप्रामानिकता आदी प्रश्न आ वासून उभे आहेत. ज्या प्रश्नांवर बाबासाहेबांनी योग्य उपाययोजना देवूनही या प्रश्नांकडे कानाडोळा केल्यामुळे भारत अजूनही विकसनशील देश आहे. इतक्या समस्या असतांनीही भारत आज एकसंथ राहण्याचे मुख्य कारण भारताचे  ' संविधान ' आहे. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ,' भारत २०२० ला विकसित राष्ट्र होईल.' हे भाकीत कोणत्या तंद्रीत केले हे मात्र प्रश्नचिन्हच  आहे. ज्या देशातील समस्याचे अगोदर निराकरण होत नाही, उलट त्या वाढतच जात आहेत आहे तेथे कलामांचे हे भाकीत बिनबुडाचे आहे.

             भारतातील जातीचे आर्थिक दृष्टीकोनातून विश्लेषण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच अर्थशास्त्रज्ञ होय. त्यांनी ठोसून सांगितले की, जातीव्यवस्थेत केवळ श्रमाचीच विभागणी झाली नाही तर त्यात श्रमिकांचीही विभागणी झाली. जगात कुठल्याही समाजात श्रमविभाजनाची अत्यंत अनैसर्गिक पंजीबद्ध करण्यात आलेल्या श्रमिकांच्या विभागणीची सांगड घातल्या गेली नाही.  जातीने श्रमिकांची श्रेष्ठ - कनिष्ठ वर्गात विभागणी केल्या गेली आहे. जसे लोहाराचा मुलगा लोहाराचेच काम करेल. सुताराचा मुलगा सुताराचेच काम करेल. या कनिष्ठ जातींना आर्थिक प्रगती वाढविण्याचा दुसरा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. भारतातील बहिष्कृत समाजात आपोआप आर्थिक तफावत निर्माण झाली नाही तर ब्राम्हणांकडून ती हेतुपुरस्सर करण्यात आली. आज जर बहिष्कृत समाज हा ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य यांच्यापेक्षा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी दृष्ट्या मागासला असेल तर याला जात ( caste) जबाबदार आहे. जातीने  बहिष्कृत लोकांना अपमानजनक ओळख आणि अप्रगतीयुक्त काम दिले. (insulting identity & useless work)  जसे एखाद्या महाराच्या पोरात कितीही विद्वत्ता असली तरी त्याच्याकडे दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन एक महाराचं पोरच असेल. दुसरी गोष्ट त्याच्यात एका इंजिनीअरची जरी ऐपत असली  तरी त्याला वर्णाश्रमाने पाडून दिलेला नाल्या साफ करण्याचाच व्यवसाय करावा लागेल. भारतीय संविधानामुळे जरी बहिष्कृत लोकांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळाले असले तरी जोपर्यंत ते हिंदू धर्माच्या जातीत राहतील तोपर्यंत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे वर्णाश्रमाचेच आधिपत्य राहील. ही व्यावसायिक आणि शिक्षणिक मानसिकता हिंदू धर्मातून कधीच जाणार नाही.

           एक आर्थिक संस्था या दृष्टीने जात ही एक घातकी संस्था आहे. कारण तिच्यामध्ये माणसाची नैसर्गिक शक्ती आणि मनोवृत्ती सामाजिक नियमांच्या जकडीत गुदमरून जाते. जातीभेदाने श्रामाचीच विभागणी केली नाही तर तिने श्रमिकांचे वर्ग सुद्धा तयार केलेत. हे वर्ग पहिल्यावर दुसरा तर दुसऱ्यावर तिसरा याप्रमाणे जन्मजात प्रतवारी लावून देणारी संस्था आहे. दुसऱ्या कोणत्याही देशात श्रमविभाजनाला अशा तर्हेचा श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलेला नाही. एकप्रकारे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात दुसरे तिसरे काही नसून एका जातीची उत्पत्ती अत्यंत श्रेष्ठ तर दुसऱ्या जातीची उत्पत्ती निर्कृष्ठ असाच दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशातर्हेचा हिंदू समाज हा एक आदर्श समाज कधीच न ठरता तो अनेक शत्रूंचे असलेले एक विशाल घरच म्हणावे लागेल. ज्या घरातील प्रत्येक सदस्य स्वत:च्या स्वार्थी आदर्शासाठी जगतो. मोठे लहानांना तुडवीत असलेले, सशक्त अशक्तांना वरचढ होतांना, निर्दय लोक निर्भय झालेले, सद्गृहस्थ भ्याड झालेले आणि शहाण्यांना कशाचीच तमा नसलेले लोक या जातीच्या वर्गवारीमुळे हिंदू धर्मात निर्माण झालेत. सर्व सुधारणांना गावच्या वेशीवर टांगणाऱ्या जातीने सार्वजनिक हिताची वृत्ती सुद्धा ठार मारली. इतकेच नाही तर सार्वजनिक लोकमत सुद्धा जातीने मारले. जातीने संपूर्ण हिंदू धर्माच्या बहिष्कृत लोकांचे जीवन नरकमय करून टाकले. ज्याविरुद्ध एल्गार करण्याची एकाही गुणवान हिंदू पुढाऱ्याची हिंम्मत कधी झाली नाही. माणसाला नपुसकत्व देणाऱ्या या धर्माबद्दल बाबासाहेब म्हणतात, “ मुसलमान निर्दयी आहेत तर हिंदू नीच आहेत, आणि नीचपणा निर्दयीपणा पेक्षा अति वाईट आहे.” अशा हिंदू धर्माला आकर्षित होऊन जर कुणी हिंदू धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली तर त्याला हिंदू धर्मातील कोणती जात मिळेल ? बहुतेक ब्राम्हण सोडून इतर वर्णात त्याचे स्थान निश्चित होईल. हिंदू समाज हा केवळ जातीचा संग्रह असल्यामुळे जात ही बंद असलेली संस्था असल्यामुळे हिंदू धर्मात मुस्लीमांसारखेच धर्मांतरीत माणसाला स्थान नाही. जोपर्यंत वर्ण आणि जाती जिवंत आहेत तोपर्यंत हिंदू धर्माचे बहिष्कृत वर्ग कधीच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अविकसित असलेल्या गुलामीच्या बेड्या तोडू शकणार नाही. 
    
       डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , "हिंदू समाज हा एक मनोरा आहे. या मनोऱ्याला शिडी नाही. त्यातील प्रत्येक जात म्हणजे इमारतीचा एक एक मजला आहे. खालच्या जातीतील लोकांना वरच्या जातीतील मजल्यात  प्रवेश नाही. खालच्या जातीतील माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या जातीत जाण्याचा मार्ग नाही तर वरच्या जातीतील मनुष्य कितीही नालायक असो त्याला खालच्या जातीच्या मजल्यात लोटून देण्याची क्षमता नाही. जातीच्या पायावर तुम्ही कोणतीही इमारत उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही; तुम्ही नितीमत्तेची उभारणी करू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही जे काही बांधाल ते कोसळून पडेल आणि एकसंघ कधीच होणार नाही.”

        जात अशी जी कधीच जात नाही. जात ती जी मुल जन्माच्या अगोदरच ठरल्या गेली आहे आणि मनुष्याच्या मृत्यूनंतरही ती पिढ्यानपिढ्या त्याला चिकटूनच असेल. मग त्याने त्याच्या आयुष्यात कितीही प्रगाढ समाजहित कार्ये केली असली तरी त्याच्या मृत्यूनंतरही  त्याला त्याच जातीने ओळखले जाईल. जो धर्मच स्वतंत्र, समता, बंधुता, न्यायावर आधारित नाही तो धर्म नसून घोड्याला आवरण्यासाठी खुट्याला बांधलेला निमुळत्या आकाराचा दोर आहे. घोडा तो दोर एका झटक्यात तोडू शकतो.पण त्याची मानसिक गुलामी त्याला त्या झटक्याने तोडणाऱ्या बलाचीही उर्जा देत नाही. अगदी तसेच हिंदू धर्माचेही आहे. ज्या जातीतून फक्त आणि फक्त गुलामीच निर्माण झाली. यावर एकमेव उपाय अशा जातीसंरचनेच्या धर्माचा त्याग करणे होय.डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  जातीच्या या अमानुष निर्मितीवर उपाय देतांनी त्यांच्या Annihilation of Caste या पुस्तकात म्हणतात, ” सर्वात पहिली आणि महत्वाची लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हिंदू समाज ही एक भाकड कथा आहे. जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही. माझ्या मते जर चूक कोणती असेल तर त्यांचा धर्म. कारण त्यानेच जातींची कल्पना लोकांच्या मनावर बिंबविली आहे. हे जर खरे असेल तर ज्याच्याशी तुम्ही दोन हात करावेत असा तुमचा शत्रू जाती पाळणारे लोक नसून ज्या शास्त्रांनी लोकांना जातीधर्म शिकविला ती शास्त्रे तुमचा शत्रू होय हे उघड आहे. सहभोजनात भाग न घेणाऱ्या किंवा मिश्र विवाहास तयार न होणाऱ्या लोकांना शिव्या देऊन किंवा त्यांची टर उडवून काही फायदा होण्यासारखा नाही. तसेच प्रसंगपरत्वे सहभोजन घडविणे किंवा एखादा मिश्र विवाह समारंभ घडवून आणणे हे उपाय अपेक्षित ध्येयाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. शास्त्रे पवित्र असल्याबद्दलची श्रद्धा नष्ट करणे हा त्यावरील खरा उपाय आहे. लोकांच्या मनावर अंधश्रद्धा बिंबविण्याचे व त्यांची मने घडविण्याचे शास्त्रांचे काम सुरू ठेवून तुम्ही यशाची आशा तरी कशी करू शकता? शास्त्राच्या अधिकाराला शह न देता, लोकांना शास्त्राच्या पवित्र्यावर विश्वास ठेवण्याची परवानगी देऊन केवळ लोकांना निर्दय व बुद्धिहीन म्हणणे हा समाज समाजसुधारणेचा अत्यंत भेकड असा मार्ग होय. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शास्त्राच्या दास्यातून मुक्त करा, बुद्धाने जो पवित्र घेतला तोच तुम्हालाही घ्यावा लागेल. केवळ शास्त्रांना झुगारून तुमचा प्रश्न सुटणार नाही तर बुध्द आणि गुरुनानकांप्रमाणे तुम्हाला त्यांचे पवित्र्यही अमान्य करावे लागेल. *‘तुमच्यात जर काही घाणेरडे असेल तर तो तुमचा धर्म होय, या धर्मानेच तुमच्याच जातींच्या पवित्रपणाची भावना निर्माण केली’ असे सांगण्याचे तुम्ही धाडस दाखवाल काय ? म्हणूनच असा धर्म नष्ट केला पाहिजे, असे म्हणतांना मला मुळीच संकोच वाटत नाही. आणि मी तर असे म्हणतो की, असा धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आपण कोणताही अधर्म करीत नाही. खरेच, मी असे ठासून सांगतो की, या नियमांच्या जत्थ्यांच्या संग्रहाचा मुखवटा फोडून टाकणे, धर्माच्या नावाने घातलेला बुरखा फाडून त्याचे खरे स्वरूप उघड करणे तुमचे अटळ कर्तव्य आहे.” बाबासाहेबांच्या याच वक्तव्यावर जणू काय गांधी त्यांच्या ‘हरिजन’ वृत्तपत्रात बाबासाहेबांच्या Annihilation of Caste या पुस्तकावर टीका लिह्तांनी म्हणतात, “डॉ.आंबेडकर हे हिंदू धर्माला मिळालेले आव्हान आहे.” ( Dr,Ambedkar is challenge for Hinduism) 

      १९३६ च्या त्यांच्या जातीच्या या संशोधनावर आधारीत बाबासाहेब २० मे १९५१ दिल्ली येथील भाषणात म्हणतात, “ जर लोक पुन्हा बौध्द धर्माचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाने शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार करावा. हाच एकमेव उपाय आहे.”

         १९५६ पासून हिंदू धर्माचा त्याग करून ज्यांनी बौध्द धम्म अंगिकारला त्यांच्या जीवनात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे.  सुधारणेच्या प्रत्येक क्षेत्रात जात आडवी येत आहे. जोपर्यंत  विनाश होत नाही तोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समता नाही. जात ही  हिंदू धर्माला मिळालेली ब्राम्हणांची एक महान अमानुष देन आहे. ज्यात विनाशाशिवाय दुसरे काहीच नाही. *जातीवर असा धर्म त्यागनेच हाच एकमेव उपाय जातीअंतावर आहे. याशिवाय जातीचा नाईनाट होण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही.

लेखक:- हर्षवर्धन ढोके

(लेख साभार :- ‘अंधश्रद्धेचा नायनाट’ या पुस्तकातून:- लेखक :- हर्षवर्धन ढोके )

Friday, 10 February 2017

"बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.

 "बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.    

भारताचा १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास.....

शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकवली जात नाही की,  ह्या भारतावर १२०० वर्षे पेक्षा जास्त वर्षे "बौद्ध" राजांचे राज्य होते........

प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य
यामुळे "पाली" भाषा ही भारताची "राजभाषा" होती, तर "बौद्ध" धम्म भारत देशाचा "राजधर्म" होता.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल 2००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या, अगदी अफगाणीस्थानातील कंदाहारपर्यत ह्या लेण्या व बुद्ध मुर्त्या पाहावयास मिळतात.
म्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास प्राचीन भारत हे "बौद्धराष्ट्र" होते ह्याची ग्वाही देतात.

भारतात २००१ च्या जनगणनेनूसार १०० कोटीपैकी १ कोटीच लोक बौद्ध होते.
परंतु जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १५० कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही.
ही लोकसंख्या तलवारीच्या किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता, तत्वज्ञान व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली आहे.
याला कारण बौध्द धम्मतील तत्वज्ञान आणि  भारतातील बौद्धराजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसार जगभर केला.......
बौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क,मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे पाल असे छोटे मोठे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला.
त्यापैकी सम्राट अशोक या महान सम्राटाने भारतजंबुद्वीपात एकुण 84000 स्तुप, विहार व लेण्या बांधल्या याचा पुरावा अशोकस्तंभात लिखीतस्वरूपात मिळतो.

म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला,विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी "बौद्ध" तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची १९ विद्यापीठे निर्माण झाली, व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद् विद्यापीठांनी केले.....

भारत जेव्हा "बौद्धमय" होता, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता. महिलांना मान-सन्मान होता, सर्वांना न्याय मिळत होता. जागतिक व्यापारात भारताचा वाटा सुमारे ३०% हून अधिक होता. सोन्याचा धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशयोक्तीने म्हटले जाते. भारत सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता. आजही भारताला संपूर्ण जगात "बुद्धाचे राष्ट्र" किंवा "बुद्धभूमी" म्हणूनच ओळखतात. भारतात कुठेही उत्खनन केले तर तथागत बुद्धांच्या मूर्त्याच सापडतात.

 एका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की,
 ज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय.
"बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.    

Monday, 15 February 2016

जिवाजी महार

" पैलवान जिवाजी महार "
उमरठ हे गाव तसं ३५० वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तान्हाजीरावांचा.
आज गावाची यात्रा भरली होती.गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.
राजांची आणि तान्हाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची.मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची ,त्यांचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे..हा हिरडस मावळातला ..वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.
वास्तविक सर्वजन शिवाजी राजाना पाहायला जमणार होते, आणि का नाही जमणार.??
लेकीसुना, संत सज्जन ,गाइवसरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे .स्वराज्य आणले होते ..!
मैदान खचाखच भरले होते.लहान मोठ्या कुस्त्याला प्रारंभ झाला.
आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयानी पांढरा अंगरखा घातला होता..
कृष्णा घोडीवर स्वार होते,आणि कमरेला  तलवार बांधली होती..जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.
राजे खाली उतरले ..
तान्हाजीराव आपल्या फौजेसह राजाना भेटायला वाटेतच थांबले होते.रजानी तान्हाजीरावना मिठी मारली.
तितक्यात खबर आली कि ,बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता .त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .
वाघाने त्यांच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने .
हे ऐकून मैदान शांत झाले.खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल आले होते.
आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते
'' मंडळी,लखू बेराडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.म्हणून तो आज लढू शकत नाही.
या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल.असेल तर समोर या.''
हि घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चीमेकडे कुजबुज सुरु झाली.
एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता.सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.
तितक्यात कोणतरी किंचाळला
''आरं आला रं जीवामहार आला ''
राजांनी चौकशी केली तान्हाजीरावान्पाशी ..
तान्हाजी म्हणाल..''राज ,ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय,कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा.दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होत..
निजामशाहीचा दंगा झाला तव ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय.""
राजांच्या चेहर्य्यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली .
भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता.डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
भिकाजी ने उसन्या अवसानान पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जीवा ने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.
सगळ प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले.जीवाला अक्षरश डोक्यावर घेवून नाचू लागले
तितक्यात शिंगे -करणे गरजू लागली ..खुद्द राजे येत होते,
पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयानी हासत हासत जीवाला मिठीच मारली..मनात काय राजकारण होते माहित नव्हते मात्र राजे जाम खुश झाले होते..
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले..आणि विचारले..
जीव काय करतोस ??
जीव उद्गारला ,'' काय नाय वरातीत पट्टा फिरवतो..दंगलीत कुस्त्या खेळतो''
राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ...!!
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमान्च्यासोबत..!!
आहे कबुल ..??
जीवा हासला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.
आणि हाच तो जीवाजीराजे महार ज्याने अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  
 
म्हणतात ना होते जीवाजी
                   म्हणून वाचले शिवाजी                                                                         
जय जिवाजी जय शिवाजी 

महात्मा फुले यांनी रचलेला छत्रपती शिवाजी राजे यांचा पोवाडा


छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |
काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |
असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले |
जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले |
जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले |
ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले |
स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले |
नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले |
जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले |
मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले |
म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले |
विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले |
ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले |
कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले |
चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले |
धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले |
कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे |
पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले |
ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले |
चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले |
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले |
गातों गीत तिने केले ||
||चाल ||
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |
चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||
मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||
पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |
थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |
दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ||
|| चाल ||
मालोजी राजा | तुझा बा आजा ||
यवनी काजा | पाळिल्या फौजा ||
लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||
विचारी पक्का | जाधवा धक्का ||
शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||
द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||
देवळे बांधी | तळी ती खांदी ||
आगळी बुध्दी | गुणाने निधि ||
लिहीले विधि | लोकांस बोधी ||
संधान साधी | जसा पारधी ||
भविषी भला | कळले त्याला ||
सांगोनी गेला | गादी बा तुला ||
उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा |
शिपाई होता बाणीचा ||
खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || १||

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले |
धाकट्यासवे ख़ेळले ||
उभयतांचे एकचित तालमीत गेले |
फरीगदग्या शिकले ||
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे |
पवित्र दस्तिचे केले ||
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले |
घोडी फिरवू लागले ||
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले |
गोळी निशाण साधले ||
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले |
पुत्रा नीट ऐकविले ||
अल्पवयांचे असता शिकार करू लागले |
माते कौतुक वाटले ||
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |
घर सक्‍तिने घेतले |
छाती कोट करून सर्व होते साठविले|
मुखमुद्रेने फसविले ||
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले |
पित्यास मनी त्यागिले ||
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले |
हीत उपदेशा योजिले ||
मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले |
वृक्षाछायी बसविले ||
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले |
नेत्री पाणी टपटपले ||
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले |
सांगते मुळी कसे झाले ||
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले |
क्षेत्री सुखी राहीले ||
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले |
होते लपुन राहीले ||
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले |
गोमांसा भाजून धाले ||
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले |
झाडी उल्लघून आले ||
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले |
मुख्य ब्रम्हा नेमले ||
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले |
कैदी सर्वास केले ||
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले |
डौलाने क्षुद्र म्हणाले ||
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले |
त्याचे पुढे भेद केले ||
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले |
उरल्या क्षत्रिया पिडीले ||
माहारमांग झाले किती देशोधडी केले |
ब्राम्हण चिरंजीव झाले ||
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले |
सर्वास त्याही पिडीले ||
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले |
आज बोधाया फावले ||
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले |
बोली नही मन धाले ||
||चाल ||
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर |
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ||
दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर |
झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर |
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार |
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार |
दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर |
उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ||
मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर |
दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार |
निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||
आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार |
गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||
||चाल ||
काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पीडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |
बेत मग केला लढण्याचा ||
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा |
स्नेह यशाजी कंकाचा ||
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा |
पूर करी हत्यारांचा ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |
रोविला झेंडा हिदूंचा ||
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा |
भ्याला मनी विजापूराचा ||
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा |
दादोजी कोंडदेवाचा ||
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||२||

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात |
चाकरी ठेवी लोकांस ||
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास |
मुख्य केले फिर्डोजीस ||
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास |
कैद पाहा केले मामांस ||
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास |
करामत केली रात्रीस ||
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास |
सिंहगड नाव दिले त्यास ||
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास |
कैद पाहा केले सर्वांस ||
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस |
मारले नाही कोणास ||
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास |
साठवी राजगडांस||
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ||
बाकी चारा किल्ल्यास ||
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस |
धूर्त योजी फितुरास ||
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास |
मुलान्या सुभेदारांस ||
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास |
योजना केली कपटांस ||
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास |
कैद तुम्ही करां शहाजीस ||
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास |
दग्याने कैद केले त्यास ||
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास |
खुशी मग झाली यवनांस ||
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास |
ठेविले भोक वार्‍यास ||
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस |
ऐकून भ्याला बातमीस ||
पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास |
विचारी आपल्या स्त्रियेस ||
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस |
ताडा दंडी दुसमनास ||
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास |
पाठवी दिल्ली मोगलांस ||
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस |
सोडवा माझ्या पित्यास ||
मोगल थैली गेली थेट मुसलमानास |
ठेविले किल्ल्यावर त्यास ||
बाजी शामराज का लाजला जात सांगायास |
धरू पाही शिवाजीस ||
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस |
आडचण झाली बखरीस ||
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास |
काळे केले महाडास ||
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस |
हा पाजी मुकला जातीस ||
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस |
यवन भ्याला सिंहास ||
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास |
पिताभक्‍ती पुत्रास ||
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस |
दुसरे वासोट्या किल्ल्यास ||
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास |
नवे योजी हुद्यास ||
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास |
चलाखी दावी मोगलांस ||
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास |
पाठवी गडी लुटीस ||
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस |
लुटी हत्तिघोड्यांस ||
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास |
चाकरी ठेवी बारगिरास ||
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास |
चाकरी ठेवि पठाणास ||
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास |
उदासी लाभ शिवाजीस ||
आबजूलखान शूर पठाण आला वाईस |
शोभला मोठा फौजेस ||
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस |
कमी नाही दारूगोळिस ||
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस |
फितवीले लोभी ब्राम्हणास ||
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास |
चुकला नाही संकेतास ||
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास |
बरोबर आला बेतास ||
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास |
कमी करी आपल्या चालीस ||
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस |
भ्याला तुमच्या शिपायांस ||
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस |
लागला भेटू शिवाजीस ||
वर भेटभाव वाघनख मारी पोटास |
भयभित केले पठाणास ||
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस |
झोंबती एकमेकांत ||
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस |
पठाण मुकला प्राणास ||
स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास |
राहिला उभा लढण्यास ||
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास |
तान्हाजी भिडे बाजूस ||
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास |
घाबरे केले दोघांस ||
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस |
लाथाळी जीवदानास ||
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस |
न्याहाळी प्रेती धन्यास ||
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास |
गेला जन्नत स्वर्गास ||
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस |
पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास |
दुसर्‍या सरंजामास ||
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास |
पाठवि विजापूरास ||
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस |
फितुर्‍या गोपीनाथास ||
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|
उपमा नाही आनंदास || ||चाल ||
|| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||
||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा |
आर्शिवाद घेई आईचा ||
आलाबला घेई आवडता होता जिजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||३||

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास |
केले मग सुरू खंडणीस ||
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास |
नेमिला कोल्हापुरास |
स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास |
आला थेट पन्हाळ्यास ||
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस |
अति जेर केले त्यास |
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास |
परत मग आला गडास ||
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास |
मात गेली विजापुरास ||
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस |
सावंत सिद्दी कुमकेस ||
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास |
करी मग जमा बेगमीस ||
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास |
केले महाग दाण्यास ||
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस |
कोंडिले गडी फौजेस ||
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास |
योजनां करी उपायास ||
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास|
उपद्रव झाला रयतेस ||
पासलकर बाजीराव पडाले वाडीस |
दुःख मग झाले शिवाजीस ||
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास |
खुशाल गेला भेटीस||
वेळ करून गेला उरला नाही आवकास |
कच्चा मग ठेवी तहास ||
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस |
गेला थाप देऊन गडास ||
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश |
हयगय झाली जप्तीस ||
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस |
सविले मुसलमानांस ||
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास |
स्वारदळ लावी पाठीस ||
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस |
बंदुका लावी छातीस |
बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास |
एकटा गेला रांगण्यास ||
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस |
हरवी नित्य मोगलास ||
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास|
धन्य त्याच्या जातीस ||
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास |
खवळला बाजी युध्दास ||
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास |
पडला प्रभू भूमीस ||
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस |
अंती मनी हाच ध्यास ||
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास |
निघून गेला स्वर्गास ||
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास |
पाहून स्वामीभक्‍तीस ||
विजापुरी मुसलमान करी तयारीस |
खासा आला लढण्यास ||
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस |
वश करी चाचे लोकांस ||
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास |
मारले पाळेगारांस ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |
राजगडी स्थापी देवीस ||
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस |
केली मग मोठी मजलस ||
तानसैनी भले गवय्या बसवी गायास |
कमी नाही तालस्वरास ||
||चाल ||
जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||
छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||
छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||
मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||
सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||
भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||
मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||
आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||
आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||
बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||
||चाल ||
आदी आंतन | सर्वा कारण ||
जन्ममरण | घाली वैरण ||
तोच तारण | तोच मारण ||
सर्व जपून | करी चाळण ||
नित्य पाळण | लावी वळण ||
भूती पाहून | मनी ध्याईन ||
नाव देऊन | जगज्जीवन ||
सम होऊन | करा शोधन ||
सार घेऊन | तोडा बंधन ||
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || ४||

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास |
मागे फौज कुमकेस ||
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास |
शिवाजी करी तयारीस ||
खरा करून गेला छापा घाली मुधोळास |
मारिले बाजी घोरपड्यास ||
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस |
घेतले बापसूडास ||
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस |
धमकी देई पोर्तुगीस ||
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ||
बांधिले नव्या जहाजास |
जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस |
शोभला हुद्दा भंडार्‍यास ||
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस |
उभयता आणिले एकीस ||
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस |
शिवाजी लागे चरणास ||
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश |
थोडेसे गाऊ अखेरीस ||
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास |
उणे स्वर्गी सुखास ||
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास |
भेट मग देई यवनास ||
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास |
साजे यवनी स्नेहास ||
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास |
घेतले बहूता किल्ल्यास ||
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस |
घाबरे केले सर्वांस ||
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस |
जलदि केली घेई पुण्यास ||
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस |
फुकट मागे किल्ल्यास ||
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस |
खान खाई मनास ||
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास |
भीति आंतल्या मर्दास ||
लागोपाठ मार देत हटवि पठाणास |
खचला खान हिंमतीस ||
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास |
देई मुसलमानास ||
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास |
देऊन मान सोडी सर्वास ||
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास |
वाढवी मोठ्या पदवीस ||
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास |
पीढिजाद चाकरीस ||
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस |
मदत शाईस्तेखानेस ||
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास |
जाळून पाडिला ओस ||
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस |
जखमा केल्या नेताजीस ||
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास |
पाहून मोगलसेनेस ||
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास |
खान राही तेथे वस्तीस ||
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास |
होता, भित शिवाजीस ||
लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश |
मावळे सोबत पंचवीस ||
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस |
कळाले घरांत स्त्रीयांस ||
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास |
लागला खाली जायास ||
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास |
तोडिले एका बोटास ||
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस |
भित्रा जपला जिवास ||
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस |
उपमा नाही हिजड्यास ||
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास |
परतला सिंहगडास |
डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस |
दावी भय शिवाजीस ||
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस |
शत्रू पळाला भिऊन मारास ||
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास |
मुख्य केले माजमास ||
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस |
दावी भय पोर्तुगास ||
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास |
हुल कसी दिली सर्वास ||
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस |
दाखल झालो सुर्तेस ||
यथासांग सहा दिवस लुटी शहरास |
सुखी मग गेला गडास ||
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास |
आपण बसे ऐकायास ||
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस |
लागले हरणापाठीस ||
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |
शाहाजी मुकला प्राणास ||
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |
पार मग नाही दुःखास ||
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस |
घेई पुढे शिवाजीस ||
||चाल ||
अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||
सवतीवर लोटती बाळा |
डाग लाविला कुणबी कुळा ||
सवतीला कसे तरी टाळा |
कज्जा काढला पती मोकळा ||
खर्‍या केसाने कापि का गळा |
नादी लागला शब्द कोकीळा || मुख दुर्बळ राही वेगळा |
अती पिकला चिंतेचा मळा ||
झाला शाहाजी होता सोहळा |
मनी भूलला पाहूनी चाळा ||
बहुचका घेती जपमाळा |
जाती देऊळा दाविती मोळा ||
थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा |
विषचुंबनी देती गरळा ||
झाला संसारी अती घोटाळा |
करी कंटाळा आठी कपाळा ||
मनी भिऊन पित्याच्या कुळा |
पळ काढला गेले मुताळा ||
छातीवरी ठेवल्या शिळा |
नाही रुचला सवत सोहळा ||
कमानीवर | लावले तीर ||
नेत्रकटार | मारी कठोर ||
सवदागर | प्रीत व्यापार ||
लावला घोर | सांगते सार ||
शिपाई शूर | जुना चाकर ||
मोडक्या धीर | राखी नगर ||
आमदानगर | विजापूरकर ||
मंत्रि मुरार | घेई विचार ||
वेळनुसार | देई उत्तर ||
धूर्त चतुर | लढला फार ||
छाती करार | करी फीतूर ||
गुणगंभीर | लाविला नीर ||
होता लायक | पुंडनायक ||
स्वामीसेवक | खरा भाविक ||
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा |
बजावला धर्म पुत्राचा ||
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा |
शत्रु होता आळसाचा ||
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||५||

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास |
शिक्का सुरू मोर्तबास ||
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस |
भौती औरंगाबादेस ||
विजापूरची फौज करी बहुत आयास |
घेई कोकणपटीस ||
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस |
ठोकून घेई सर्वास ||
जळी फौज लढे भौती मारी गलबतास |
दरारा धाडी मक्केस ||
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस |
पुकारा घेतो मोगलास ||
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास |
लुटले बारशिलोरास ||
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास |
लुटले मोगल पेठांस ||
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस |
आज्ञा जावे रायगडास ||
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास |
निघाला मुलखी जायास ||
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास |
लागले अखेर कडेस ||
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास |
दुसरे दिलीरखानास ||
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास |
वेढिले बहुता किल्ल्यास ||
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस |
सुचेना काही कोणास ||
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास |
सोडिले नाही धैर्यास ||
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस |
संभाळी पुरंधरास ||
चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस |
फु्रसत दिली शिवाजीस ||
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस |
भिडला किल्ला माचीस ||
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास |
योजी अखेर उपायास ||
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास |
पिडीले फार मोगलास ||
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस |
काबीज केले माचीस ||
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस |
चुकले सावधपणास ||
हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास |
मोगल हटले नेटास ||
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास |
भिडून मारी मोगलांस ||
पळ काढी पाठ दिली मावळ्यास |
मर्द पाहा भ्याले उंदरास ||
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस |
धीर काय देई पठाणास ||
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास |
जाऊन भिडला मावळ्यास ||
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस |
हटती पाहून मर्दास ||
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास |
लावीला तीर कमानीस ||
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस |
पाडिला गबरू धरणीस ||
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस |
सरले बालेकिल्ल्यास ||
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस |
धमकी देती मावळ्यास ||
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस |
पळवी इशानी कोणास ||
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस |
वरती चढवी तोफांस ||
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |
मोगल भ्याला पाऊसाअ ||
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस |
घेती यवनी मुलखास ||
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास |
पाठवी थैली शिवाजीस ||
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस |
नजरकैद करी त्यास ||
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस |
ठेविले जवळ पुत्रास ||
दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस |
जोडीला स्नेह सर्वास ||
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास |
गूल पाहा औरंगजेबास ||
आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस |
जसा का मुकला जगास ||
दानशूर बनला हटवी हातिमताईस |
चुकेना नित्यनेमास ||
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस |
बाकी सोपी चाकरास ||
जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस |
नेली युक्‍ती सिध्दीस ||
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस |
लावि पाठी माजमास ||
|| चाल ||
औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||
मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||
रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||
माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||
स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||
||चाल ||
हैद्राबादकर | विजापूरकर ||
कापे थरथर | देती कारभार ||
भरी कचेरी | बसे विचारी ||
कायदे करी | नीट लष्करी ||
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा |
बंदोबस्त केला किल्ल्याचा ||
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||६||

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला |
बेत छाप्याचा सुचवीला ||
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला |
मावळी हजार फौजेला ||
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला |
योजिले दोर शिडिला ||
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला |
हळूच वर चढवीला ||
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला |
करी तयार लोकाला ||
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला |
घाबरा गढकरी केला ||
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला |
सुर्याजी येऊन ठेपला |
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला |
उगवी बंधु सुडाला ||
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला |
घेतले सिंहगडाला ||
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला |
झाले दुःख शिवाजीला ||
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला |
रुप्याची कडी मावळ्याला ||
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला |
पिडा जंजिरी सिद्द्याला ||
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला |
मोगल जेरदस्त केला ||
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला |
त्यामधी अनेक स्त्रियांला ||
सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला |
सुरू केले चौथाईला ||
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला |
देई मोठ्या फौजेला ||
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला |
धिंगाणा दक्षिणेत केला ||
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला |
मोरोबा पठाण पंक्‍तीला ||
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला |
जसा खरा मोड झाला ||
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला |
आळसाने ढिला पडला ||
गुजर संधी पाहून परत मुरडला |
चुराडा मोगलाचा केला ||
बेवीस उमराव पाडले रणभूमीला |
नाही गणती शिपायाला ||
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला |
पाठवी रायगडाला ||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला |
खिदाडी औरंगाबादेला ||
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला |
गोडबोल्या गोवी ममतेला ||
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला |
निवडले नाही शत्रूला ||
जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला |
राहिले ठेवी चाकरीला ||
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला |

शिवाजी धनी आवडला ||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला |
हाजरी देती शिवाजीला ||
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला |
बंदरी किल्ला वेढीला ||
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला |
बनया धर्मा आड झाला ||
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला |
दुजे मोहबतखानाला ||
उभयतांचा बदली खानजहान आला |

मुख्य दक्षीणेचा केला ||
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला |
गोवळकुंडी उगवला ||
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला |
सुखे मग रायगडी गेला ||
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला |
लुटले हुबळी शहराला ||
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला |
केले खुले देसाईला ||
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला |
आणिक चार किल्ल्यांला ||
|| चाल ||
हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||
द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||
शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||
केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||
आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||
निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||
रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||
गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||
||चाल ||
आबदुल्याने | बेशर्म्याने ||
फौज घेऊन | आला निघून ||
राव प्रताप | झाला संताप ||
आला घाईने | गाथी बेताने ||
घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||
घेई घालून | गेला मरून ||
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला |
पाठलाग मराठ्यांचा केला ||
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला |
गेले नाही शरण शत्रूला ||
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला |
हल्ला शत्रूवर केला ||
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला |
पळिवले विजापुरला ||
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला |
शिवाजी मनी सुखी झाला ||
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला |
पोशी सर्व कुटूंबाला ||
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला |
व्याही केले गुजराला ||
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा |
केला खेळ गारूड्याचा ||
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा |
खर्च नको दारूगोळीचा ||
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा |
पवाडा गातो भोसल्याचा ||
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||७||

विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला |
शिवाजी कोकणांत ||
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला |
जमाव फौजेचा केला ||
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला |
फितीवले कसे निजामाला ||
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला |
वाटणी मागे व्यंकोजीला ||
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला |
आशेने फिरवी पगडीला ||
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला |
बिर्‍हाडी रागाऊन गेला ||
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला |
कैदी नाही केले भावाला ||
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला |
खडा कानाला लावला ||
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला |
करनाटकी मुख्य केला ||
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला |
निघाला परत मुलखाला ||
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला |
तेथे ठेवी सुमंताला ||
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला |
घेतले स्वःता अपेशाला ||
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला |
शिवाजी रायगडी गेला ||
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला |
मोगल मुलखी सोडला ||
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला |
सोडिला नाही पिराला ||
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला |
ग़्हाबरा अतिशय केला ||
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला |
वाट पुढे चालू लागला ||
दुसरी फौज आडवी माहारज राजाला |
थोडेसे तोंड दिले तिजला ||
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला |
धूळ नाही दिसली शत्रूला ||
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला |
फसविले आयदी मोगलाला ||
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला |
आश्रय मागे शिवाजीला ||
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला |
बरोबर देई फौजेला ||
नऊ हजार मोगलांचा पराभव केला |
ज्यानी मार्ग अडीवला ||
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला |
केला महाग दाण्याला ||
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला |
मोगल भिऊन पळाला ||
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला |
पाठवी शाहजहानाला ||
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला |
लाविला नीट मार्गाला ||
तह करून शिवाजी नेती विजापुरला |
यवन घेती मसलतीला ||
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला |
व्यंकोजी मनी दचकला ||
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला |
निरा संन्यासी बनला ||
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला |
लिहीतो पत्र अर्थाला ||
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला |
हिरा का भ्याला कसाला ||
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला |
मळावाचून काटला ||
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला |
तुम्ही का मजवर रुसला ||
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला |
त्यागा ढोंगतोर्‍याला ||
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला |
संभाळा मुळ आब्रुला ||
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला |
नित्य जपतो या जपाला ||
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला |
सोड मनच्या आधीला ||
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला |
व्यंकोजी लागे कामाला ||
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला |
रोगाने अती जेर केल ||
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला |
शिवाजी सिसी दुःखाला ||
यवनी विरास भिडता नाही कुचमला |
शिवाजी रोगाला भ्याला ||
सतत सहा दिवस सोसी तापदहाला |
नाही जरा बरळला ||
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला |
एकटा पुढे आपण झाला ||
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला |
पडले सुख यवनाला ||
कुळवाडी मनी खचले करती शोकाला |
रडून गाती गुणाला ||
||चाल ||
महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||
सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||
दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||
लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||
लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||
बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||
वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||
चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||
लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||
कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||
युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||
चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||
पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||
युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||
टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||
दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||
आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||
सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||
||चाल ||
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
आस सोयरी | ठेवी पदरी ||
लाडावरी | रागाचे भारी ||
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा |
उडवी फट्टा ब्रम्हाचा ||
जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा |
मुख्य धनी पेशव्याचा ||
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||८||

"" योद्धा महार""

महार ही जात प्राचीन काळापासूनच लढवय्यी, शूरवीर, कर्तबगार, पराक्रमी आहे. त्यांची पराक्रम बघून भल्याभल्यांचा थरकाप उडायचा म्हणूनच प्राचीनकाळी त्यांना महा + अरि म्हणजे मोठा शत्रू अशा विशेषणाने संबोधले जायचे पुढे या विशेषणाचा अपभ्रंश होऊन महार झाले. त्यांच्या या पराक्रमी वृत्तीमुळे कालांतराने त्यांच्यावर अंकुश असावा म्हणून धर्माच्या नावाखाली सामाजिक बंधणे घालून, अन्याय करून शक्तिहीन करण्याचे प्रयत्न केले गेले.
अलिकडच्या इतिहासात पाहले तर शिवरायांचे काळा महारांनी अनेक लढायात पराक्रम करून स्वराज्याच्या स्थापनेत आपले भरीव योगदान दिले होते.
शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा किल्लेदार रायनाक महार होता तसेच दुसर्या महत्वाच्या रोहीडा किल्ल्याच्या नाईक पदाची जिम्मेदारी कालनाक महार व सोंडकर महार यांच्या पदरी होती.
संभाजी राजेची बर्हाणपुरात धिंड काढल्याने पाहून एकटाच बंड संभाजी राजेंच्या आजूबाजूचे 15-20 गनिम कापणारा रायप्पा महार आणि संभाजी राजेंच्या हत्येनंतर पेटलेल्या संग्रामात मोगलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीच्या महार व मौजे वेलंग चे सिदनाक महार होते. यानंतरही मराठे व पुढे पेशव्यांनी चालवलेले राज्य हे स्वराज्य आहे म्हणून त्याकडे वाकड्या डोळ्याने पाहणार्या मुघल व ब्रिटीश फौजे विरूध्द तळहातावर शिर घेऊन लढणारे कित्येक योध्दे महार जातीचेच होते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनी पेशव्यांना अनेक लढाया जिंकून दिल्या. तरीसुद्धा पेशवे ब्राह्मणी अहंकारामुळे शुरवीर महारांचा सदैव अपमान व अवहेलनाच करायचे.
शिदनाक महार व त्यांच्या सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे माधवराव पेशव्याला खर्ड्याच्या विजय प्राप्त झाला परंतु त्याकडे दुर्लक्ष करून विजयाच्या उन्मादात ब्राम्हणांनी त्याच रणांगनावर शिदनाक व त्यांच्या महार सैनिकांचा अपमान केला.
प्रत्येक लढाईतील महारांचा पराक्रम व त्यांच्यामुळे मिळणारे यश पाहून पेशव्यांचा उर धपापल्या जायचा आणि याचमुळे त्यांना महारांची धास्ती वाटायची. कदाचित 'आपण जसे शिवरायांचे राज्य बळकावले तसे महारांनी आपले राज्य हिरावून घेतले तर....... ही भिती वाटत असावी शेवटी चोराच्या मनात चांदणे.
केवळ याच कारणामुळे इतर अतिशूद्र जातींपेक्षा महार जातीचा पेशवे अतिशय द्वेष करायचे म्हणून महारांना काबूत ठेवण्यासाठी कोकणस्थ ब्राम्हण पेशव्यांनी सत्ता व धर्माच्या जोरावर महारांवर कडक बंधने घातली. महारांचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेतले. महार, मांग, चांभार अतिशुद्र व अस्पृश्य म्हणून गावकुसाबाहेर राहण्यास बाध्य केले. त्यांनी कसे रहावे, कसे वागावे, काय करावे याबद्दल विशेष नियम केले आणि मनुस्मृती प्रमाणे त्या नियमांचे कायदे केले. त्या कायद्यांचे उल्लंघन करणार्यांना कडक शिक्षा देण्याचे फरमान काढण्यात आले.
हे कायदे कोणते होते
● अस्पृश्यांना स्पर्श करणे पाप आहे त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू देऊ नये
● अस्पृश्यांना गावामध्ये दिवसा गावबंदी. प्रवेश करावयचाच असेल तर त्यांनी सूर्योदयापूर्वी आणि सुर्यास्तानंतरच करावा
● अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी भरण्यास बंदी, देवदर्शनास बंदी, देवळाच्या पायरीवर चढण्यास बंदी, शिक्षणास बंदी.
● अस्पृश्य समाजाच्या लोकांनी थुंकण्यासाठी गळ्यात मडके व रस्त्यावरून चालताना उमटलेल्या पाऊलखुणा व रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू बांधण्याची सक्ती.
● ब्राम्हण दिसताच अस्पृश्यांनी त्वरित खाली बसून पालथे पडावे.
● दुसर्या बाजीराव पेशव्याच्या काळात महार किंवा मांग तालीमाखान्यापुढून जातांना दिसला तर गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे
या अमानवीय कायदे व अत्याचाराबद्दल ब्रिटीश सेनापती फोर्बेस ने लिहिले आहे की, "त्या गरीब व जातीबाहेर फेकण्यात आलेल्या चांडाळाच्या स्थितीचे वर्णन मी कशा प्रकारे करू?. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. गावात त्यांना सकाळी नऊ च्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे. त्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच्छ व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. त्यांची दारुण अवस्था बघितली की माझे अश्रू आवरणेही मला कठीण होत असे. मी माझ्या क्षेत्रात या अस्पृश्यांची सुधारणा करण्याचे प्रयत्न केले पण वरिष्ठ जातीच्या मनात अस्पृश्यतेबद्दल इतके खोलवर रुजलेले गैरसमज आहेत की माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले." (बॉम्बे गॅझेटियर 1884-85)
ब्राम्हण पेशवे महारांची रणांगनावरील कर्तबगारी व पराक्रम बघून महारांचा द्वेष करायचे तरी महारांच्या पराक्रमावर आणि शौर्यावर राजवाड्यातील ब्राम्हण बायका भाळून जायच्या यामुळे त्यांच्यामधील काही स्त्रियांचे महारासोबत प्रेमप्रकरणे चालायची यातील एखादे प्रकरण उघडकीस आले तर त्या महाराचा खून केल्या जायचा गणपत महाराचा खून याच कारणासाठी केल्या गेल्या होता. अशाच प्रकारे खून करण्यात आला होता.
पेशवाईत महारवर कोणीही अन्याय कोणीही अत्याचार करायचे आणि पर्याय नसल्याने त्यांना तो निमुटपणे सहनच करावा लागायचा. केवळ अन्याय करूनच पेशव्यांचे समाधान झाले नाही म्हणून महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुद्धा त्यांनी सुरु केली. इमारतीच्या पायात, किल्ला, किल्ल्याचा बुरुज, पूल, तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. “महार-मांगाला पायभरणीत पुरले” असे शब्दोल्लेख आजही अनेक लोककथेत ऐकायला मिळतात.
एवढे असूनही इंग्रज पुण्यावर चाल करून येत असल्याचे समजताच लढाईची परवानगी मागायला रायनाक, सिधनाक सारखे वीर शनिवारवाड्यावर गेले तेव्हा नाचगाण्यात दंग असलेल्या पेशव्यांचा रसभंग झाल्याने त्यांनी त्यांना पेशव्यांचे राज्य महार-मांगाच्या भरवशावर नाही म्हणून अपमानित करून हाकलून दिले आणि मग मात्र महारांचा स्फोट झाला. आतापर्यंत झेललेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महारांचे हात शिवशिवू लागले चाणाक्ष इंग्रजानी महारांना जवळ केले आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत 1 जानेवारी 1818 रोजी 500 महार भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या 25,000 सैन्यासोबत प्राणपणाने लढले आणि पेशव्यांच्या अफाट व सुशस्र सैन्याची धूळधाण करून त्याना पळती भुई कमी केले गर्वान्ध पेशवे महारांपुढे चारी मुंड्या चीत झाले. महारांच्या अविस्मरणीय शौर्याची व पेशव्यांच्या नाचक्कीची इतिहासात नोंद झाली. पेशव्यांची उरली सुरली इभ्रत महारांनी सोलापूर व आष्टीच्या काढली आणि पेशवाई नेस्तनाबूत केली तेव्हा कुठे महार मांग जातीवरील अमानवीय छळाचा महारांच्या उरातील ज्वालामुखी शांत झाला.
बाबासाहेब म्हणायचे, " गुलामाला त्याच्या गुलामगिरीची आठवण करून द्या जेणेकरून तो बंड करून उठेल "
जय जिजाऊ..जय शिवराय.. जय शंभूराजे.. जय भिम.. जय भारत..!

Wednesday, 10 February 2016

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ऐतिहासिक कामगिरी…



छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ऐतिहासिक कामगिरी…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी
सिद्दी हिलाल
घोडदळातील सेनापती सहाय्यक
पन्हाळगडाच्या वेढ्यात ( मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले.
उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.
 
सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र)
घोडदळातील सरदार
सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी ( मार्च १६६०) आणि कैद.
 
सिद्दी इब्राहिम
शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली.
सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.
 
नूरखान बेग
स्वराज्याचा पहिला सरनोबत
२१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.
 
मदारी मेहतर
विश्वासू सेवक
आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.
 
काझी हैदर
शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव
१६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.
 
शमाखान
सरदार
कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली.
 
सिद्दी अंबर वहाब
हवालदार
जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला
 
हुसेनखान मियाना
लष्करातील अधिकारी
मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला.
बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले.
 
रुस्तमेजनमा
शिवाजी महाराजांचा खास मित्र
विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले.
हुबळीच्या लुटीत कामगिरी ( जानेवारी १६६५) चोख पार पाडली.
नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली.
सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले.
 
दर्यासारंग
आरमाराचा पहिला सुभेदार
खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला.
बसनूर जानेवारी ते फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.
 
इब्राहीम खान
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या जानेवारी ते फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला.
 
दौलतखान
आरमाराचा प्रमुख (सुभेदार)
उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०)
खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८)
सिद्दी संबुळचा पराभव ( एप्रिल १६७४)
 
सिद्दी मिस्त्री
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.
 
सुलतान खान
आरमाराचा सुभेदार
शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.
 
दाऊतखान
आरमाराचा सुभेदार
अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला.
सुलतान खान नंतर सुभेदार झाला.
पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.
 
इब्राहिम खान
तोफखान्याचा प्रमुख
स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख.
डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
 
विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही.
घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.
(
प्रेम हनवते यांच्याशिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिकया पुस्तकामधून…)